शिर्डी येथे श्री साईबाबा संस्थानचे वतीने “कोजागिरी पौर्णिमा” हा स्थानिक उत्सव साजरा करण्यात आला. रविवारी रात्रौ ११.०० ते १२.०० समाधी मंदिरात श्रींचे समोर मंत्रोच्चार करणेत येवून रात्रौ १२.०० वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांचे हस्ते चंद्र-पुजा करणेत आली.
चंद्र पुजेनंतर रात्रौ १२.१० वाजता श्रींची शेजारती संपन्न झाली, शेजारतीनंतर आरतीसाठी उपस्थित साईभक्तांना पुजेसाठी ठेवलेले दुध प्रातिनिधीक स्वरुपात प्रसाद म्हणून वाटप करण्यात आले. यावेळी प्रशासकिय अधिकारी, तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी संदीपकुमार भोसले, मंदिर विभाग प्रमुख विष्णु थोरात आदी उपस्थित होते. शिर्डीत ठिकठिकाणी विविध मंडळांच्या वतीने व संस्थांच्या वतीनेही कोजागिरी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ठिकठिकाणी संगीताच्या तालामध्ये मोठमोठ्या पातेलेत कढया यावर दूध तापवून रात्री बारा वाजता चंद्र दर्शनानंतर व पूजेनंतर दुधाचा प्रसाद भाविक भक्तांना वाटण्यात आला.
0 Comments