वैजापूर. जगताप भऊर
पूर्वी अलीकडेच शेती ही बैलाची होती त्याकामी बैल ही वर्षभर शेतात राबत असे व त्यातूनच शेतकऱ्याचा उदारनिर्वाह चालत असे आणि याच ऋणातून मुक्त होण्यासाठी पिठोरी अमावस्येच्या दिवशी बैलपोळा मोठ्या आनंदमय अशा वातावरणात प्रत्येक शेतकरी मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करत असतो. आदल्या दिवशी तेल वगैरे लावून बैलांचा खांदा हळवा जातो व आजच्या दिवशी सकाळी सकाळी दुपारपर्यंत मस्त बैल चारणे, दुपारून त्यांचे सिंग साळणे, त्यांना मस्त धुवून काढणे त्यानंतर त्यांना हिंगूळ गोंडे,घागरमाळ लावून सजवणे ही मजा शेतकऱ्यांच्या दृष्टीने वर्णनाच्या पलीकडील आहेत
या दिवशी बैलांना विशेष असा मान दिला जातो आणि म्हणून या दिवशी बैलाला कोणतेही काम दिले जात नाही नव्हे नव्हे आजच्या दिवशी बैलांना कोणतीही शिवी वगैरे देणे देखील दिली जात नाही
उदारमतवादी असलेला असा हा शेतकरी हा सण हा बैलांचा असला तरी बाकीचे पाळीव प्राणी शेळी बकरू व कुत्रा मांजर या पाळीव प्राण्यांना देखील वाऱ्यावर सोडत नाही त्यांना देखील तो या पोळा सणाच्या प्रवाहात सामील करतो
*आपली पिढी धन्य आहे की आपण पोळा सणाचा हा सर्व आनंद घेतला व घेत आहोत*
*अशा बैलपोळा सणाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा*🙏🏼🙏🏼🙏🏼
0 Comments