कुणबी-मराठा प्रमाणपत्रासाठी सोयगाव तहसील कार्यालयात विशेष शिबिर संपन्न----



दिलीप शिंदे 
सोयगाव दि. ११-- सोयगाव तालुक्यातील मराठा समाजाला कुणबी-मराठा प्रमाणपत्र मिळविण्याच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी सोयगाव तहसील कार्यालय व मंडळ विभागाच्या वतीने दि.११ शुक्रवारी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.शिबिरादरम्यान तहसीलदार मनीषा मेने यांनी मार्गदर्शन करताना,ज्या नागरिकांकडे कुणबी-मराठा नोंदी उपलब्ध आहेत, त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह जात प्रमाणपत्रासाठी अर्ज दाखल करावा,असे आवाहन केले. 

अर्ज प्रक्रियेत कोणतीही अडचण आल्यास सोयगाव तहसील कार्यालयातील दीपक फुसे यांच्याशी संपर्क साधावा,असेही त्यांनी सांगितले.मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कुणबी नोंदी व प्रमाणपत्र प्रक्रियेचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे सोयगाव तालुक्यातील मराठा समाजातील नागरिक व युवकांनी उपलब्ध जुन्या नोंदींची पडताळणी करून शासनाच्या प्रक्रियेचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. जिल्हाधिकारी विनय गौंडा,उपविभागीय अधिकारी प्रविण फुलारी, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्धन विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.नायब तहसीलदार संभाजी देशमुख,मंडळ अधिकारी श्रीमती के.एस.डिघोळे, बनोटी मंडळ अधिकारी शिवाजी सपकाळ,सोयगाव ग्राम महसूल अधिकारी एस.के.देवतुळे, धनवट ग्राम महसूल अधिकारी क्षितिज निंबाळकर, पळसखेडा ग्राम महसूल अधिकारी शिल्पा बोपटे, महसूल सेवक संभाजी बोरसे,तहसील कार्यालयातील कर्मचारी आदींसह मराठा क्रांती मोर्चाचे सोयगाव तालुका संयोजक विजय काळे,नगरसेवक बंटी काळे,कृष्णा पाटील जुनघरे, अविनाश पाटील,दत्तू निकम, अतुल चौधरी,एकनाथ गोंड,योगेश काळे, गोपाल चौधरी,पकंज देशमुख,आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments