टाकळीभान प्रतिनिधी-. मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांचे मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधिक्षक श्रीमती कल्पना अंबादास पवार मॅडम यांनी श्रीरामपुर तालुका पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारल्यानंतर पुन्हा अवैध वाळु वाहतुकीवर कारवाई केली आहे.
दि २२/०९/२०२६ रोजी रात्री ११/०० वा. प्रशि. पोलीस उप अधीक्षक श्रीमती कल्पना अंबादास पवार यांनी व पोलीस पथकाने केलेल्या कारवाईमध्ये कारेगाव शिवारात, बिरोबा मंदिर जवळ, कारेगाव ते श्रीरामपुर जाणारे रोडवर वाळु वाहतुक करणारा टेम्पो पकडला आहे. टेम्पो चालक विजय रावसाहेब लोंढे, वय ४० वर्ष, रा. वडाळा महादेव, ता. श्रीरामपुर यास ताब्यात घेऊन त्याचेकडील अशोक लेलंड कंपणीची गाडी क्र. MH १९ CY २८३६ व त्यामधील १ ब्रास वाळु असा ५, १०, ०००/- किंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीविरुध्द श्रीरामपुर तालुका पोलीस ठाण्यास गुर नं ३७४/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे दि. २४/०९/२०२६ रोजी रात्री ८/१५ वा. परि. पोलीस उपअधीक्षक कल्पना पवार मॅडम यांना मिळालेल्या गुप्त माहितीचे आधारे त्यांनी खानापुर शिवारात, पेट्रोल पंपाजवळ, खानापुर ते माळवाडगाव जाणारे रोडवर अवैधपणे वाळु वाहतुक करणारा सोनालीका कंपणीचा विना क्रमांकाचा ट्रॅक्टर व ट्रॉली पकडुन ६,१०,००० रुपये किमतींचा मुददेमाल ट्रॅक्टर ट्रॉली व वाळु जप्त केली आहे. वाळु वाहतुक करणारा ट्रॅक्टर चालकविरुध्द श्रीरामपुर तालुका पो स्टे गु र नं ३७६/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. वरील दोन्ही गुन्हयाचा तपास श्रीरामपुर तालुका पोलीस करीत आहेत.
0 Comments