गटारीचे सांडपाणी रस्त्यावर शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन तरुण व नागरिकांचे आरोग्य धोक्यात, आमखेडा ग्रामपंचायत चे दुर्लक्ष-



दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.२३ - शहरालगत असलेल्या आमखेडा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या रामजीनगर परिसरात गटारीचे सांडपाणी रस्त्यावर वाहत असून मोठमोठे डापके साचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे यामुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

ग्रामपंचायत प्रशासक अशोक दौड व ग्रामविकास अधिकारी सत्यनारायण पुल्लेवाड यांनी याकडे प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देण्याची स्थानिक रहिवाशांकडून मागणी केली जात आहे. दरम्यान रामजीनगर परिसरात व्हायरल इन्फेक्शनच्या रुग्णांमध्ये वाढ होते. ग्रामपंचायत ने स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याने शालेय विद्यार्थ्यांना रस्त्यावरील सांडपाणी ओलांडत जावे लागत आहे. यामुळे विद्यार्थी, नागरिक व संत ज्ञानेश्वर महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या युवकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. रामजीनगर परिसरात गटारींची दुरावस्था झाली असून साफसफाई होत नसल्याने दुर्गंधी युक्त सांडपाणी हे रस्त्यावरून वाहत असून काही ठिकाणी पाण्याचे डबके साचले आहे.यामुळे डासांचे प्रमाण वाढत असल्याने, डासांचा प्रादुर्भाव वाढून साथीचे रोग थैमान घालण्याची शक्यता नाकारता येत नाही. ग्रामपंचायत अधिकारी सत्यनारायण पुल्लेवाड व अशोक दौड यांनी वेळीच लक्ष देऊन सांडपाण्याचे योग्यरित्या निचरा होईल अशी उपाययोजना करावी अशी मागणी रामेश्वर बोडखे, जनाबाई ताडे, ईश्वर सोनवणे,प्रकाश गायकवाड, अमोल आगे, मनोज आगे,प्रकाश अंभोरे आदींसह स्थानिक रहिवाशांकडून केली जात आहे.

Post a Comment

0 Comments