भिंगार भारताला सर्व धर्म समभाव हम सब एक है या विचाराची गरज आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सर्व जाती धर्माला एकत्र आणून छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा जपला महात्मा फुले यांचे सच्चे वारस कर्मवीर होते म्हणून भारताला कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचाराची गरज आहे असे प्रतिपादन माजी आमदार दादा भाऊ कळमकर यांनी केले
रयत शिक्षण संस्थेचे श्रीमती ॲबट मायादेवी गुरुदिताशाह हायस्कूल व ज्युनिअर आर्ट्स कॉलेज आणि विश्वशंकर प्राथमिक विद्यालय, भिंगार यांच्या वतीने थोर शिक्षणमहर्षी व रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३९ व्या जयंतीनिमित्त तसेच विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन बुधवार, दि. २३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता शाळेच्या प्रांगणात उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले होते
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्री. दादाभाऊ कळमकर, माजी मॅनेजिंग कौन्सिल सदस्य व जनरल बॉडी सदस्य, रयत शिक्षण संस्था, सातारा होते. तर मा. श्री. प्रशांत खामकर, संचालक – रयत को-ऑप. बँक, सातारा तथा व्याख्याते, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे प्रमुख वक्ते होते श्री कळमकर म्हणाले कि सामान्य विद्यार्थी घडविण्याचे महान कार्य भाऊराव पाटील यांनी केले
यावेळी सन्माननीय मान्यवर जनरल बॉडी सदस्य अनुक्रमे म्हणून मा. श्री. शोकत तांबोळी,
मा. श्री. अनिल साळुंखे
मा. श्री. अर्जुन पोकळे,
मा. श्री. मनोज कवडे-देशमुख, हे उपस्थित होते
कार्यक्रमास मा. श्री. रमेश शिंदे पाटील, सदस्य-समन्वय समिती, रयत शिक्षण संस्था, उत्तर विभाग, अहिल्यानगर; मा. श्री. अनिल झोडगे, चेअरमन, भिंगार अर्बन बँक लि., भिंगार, अहिल्यानगर; मा. श्री. दादासाहेब पांडुळे, सदस्य, स्थानिक स्कूल कमिटी, विश्वशंकर प्राथमिक विद्यालय, भिंगार; मा. श्री. विजय बेरड, सदस्य, स्थानिक स्कूल कमिटी, विश्वशंकर प्राथमिक विद्यालय, भिंगार; मा. श्री. सुभाष पानसंबळ, सदस्य, स्थानिक स्कूल कमिटी, विश्वशंकर प्राथमिक विद्यालय, भिंगार, श्री.रासकर, माजी रयत शिक्षक यांचीही सन्माननीय उपस्थिती होती.
कार्यक्रमाचा विशेष आकर्षण ठरलेल्या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात गुणवंत व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या भावी शैक्षणिक व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी भिंगार अर्बन बँक तर्फे आरो पाणी सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली.
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ‘स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद’ या विचारातून उभारलेल्या रयत शिक्षण संस्थेची शैक्षणिक परंपरा पुढे नेण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयाचे प्राचार्य श्री. प्रमोद तोरणे प्राचार्य तथा सहाय्यक विभागीय अधिकारी, पर्यवेक्षक श्रीमती कविता शिंदे, मुख्याध्यापक श्री.नारायण अनभुले विश्वशंकर प्राथमिक विद्यालय, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
कर्मवीरांच्या कार्याचा गौरव, त्यांच्या विचारांचे स्मरण आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान अशा त्रिवेणी संगमातून हा जयंती व गुणगौरव सोहळा अत्यंत प्रेरणादायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.प्रमोद तोरणे, सूत्र संचालन श्रीम. क्रांती घातडक व श्री.शंकर मोरे, व श्रीमती कविता शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले...
0 Comments