दिलीप शिंदे
सोयगाव दि.१२-- राज्य परिवहन महामंडळाच्या सोयगाव आगारात असलेल्या ४० बसगाड्यांपैकी १६ बस गाड्या दि.११ शुक्रवारी कोकणातील गणेशोत्सव साठी मुंबई कडे रवाना झाल्या असून १० बसगाड्या या जगप्रसिद्ध अजिंठा लेणीत पर्यटकांच्या सेवेसाठी असल्याने उर्वरित १४ बसगाड्यांवर सोयगाव तालुक्यातील प्रवासी वाहतुकीचा भार असणार आहे.
यामुळे सोयगाव आगाराच्या १४ बस फेऱ्या बनोटी-शेंदूरणी-जळगाव-छत्रपती संभाजीनगर या मार्गावरील धावणाऱ्या बस गाड्या बंद झाल्या आहेत त्यामुळे आता प्रवाशांना प्रवास करण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत दरम्यान आधीच सोयगाव आगारात केवळ ४० बसेस असून त्यापैकी १६ बसेस कोकण व मुंबई कडे पाठविण्यात आल्या आहेत तर १४ बसेस अजिंठा लेणीसाठी आहेत त्यामुळे केवळ १४ बसेस वर सोयगाव आगाराच्या भार असणार आहे बनोटी मार्गावरील चाळीसगाव, शेंदूरणी मार्गावरील नाशिक, बीड,भुसावळ, जळगाव, मुक्कामी नाशिक या तर फरदापुर मार्गावरील दोन बीड,शिर्डी, हलदा मार्गाने छत्रपती संभाजीनगर, या बस सेवा बंद झालेल्या आहेत त्यामुळे आता सोयगाव आगाराच्या केवळ १४ फेऱ्या वर मदार राहणार आहे.
0 Comments