ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आध्यात्मिक व धार्मिक क्षेत्रातील सेवार्थींना प्रमाणपत्र वाटप व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमाचे आयोजन.

दिलीप लोखंडे 

टाकळीभान प्रतिनिधी: सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या टाकळीभान येथील ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने रविवार दि. २७ सप्टेंबर रोजी दुपारी ठीक १२.३० वाजता रुक्मिणी माधव मंगल कार्यालय टाकळीभान, ता. श्रीरामपूर येथे यावर्षी सामाजिक उपक्रम म्हणून श्रीरामपूर तालुक्यातील आध्यात्मिक व धार्मिक क्षेत्रातील सेवार्थींना प्रमाणपत्र वाटप व विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती संस्था यांना राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

या कार्यक्रमांमधील अध्यात्मिक धार्मिक क्षेत्रातील सेवार्थींना प्रमाणपत्र व विविध क्षेत्रातील पुरस्कार वितरण छ. संभाजीनगरचे जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश पा. गलांडे यांचे शुभहस्ते व श्रीक्षेत्र देहू संस्थानचे विश्वस्त ह. भ. प. माणिक महाराज मोरे इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम होणार असून याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे आ. हेमंत ओगले , मा. सभापती डॉ, वंदनाताई मुरकुटे, ज्ञानेश्वर संस्थानचे खजिनदार- विश्वस्त माऊली महाराज शिंदे, जि. परिषद माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी श्रीम.संध्याताई गायकवाड, मा. सभापती नानासाहेब पवार, संत साहित्यिक व लेखक दत्तात्रय गायकवाड , राष्ट्रवादी किसान सभेचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोकणे, शिवसेनेचे जिल्हा संघटक दादासाहेब कोकणे, निसर्ग पर्यावरण मंडळाचे राज्य उपाध्यक्ष डॉ. अनिल लोखंडे सर, निसर्ग पर्यावरण मंडळाचे राज्य कार्याध्यक्ष प्रा. संतोष परदेशी, अशोकचे कारेगाव भागचे संचालक शिवाजीराव शिंदे, ह भ प दत्तात्रय बहिरट महाराज,श्रीरामपूर पं. समिती प्रभारी गटशिक्षणाधिकारी दीपक त्रिभुवन,ज्येष्ठ ग्रामीण कवी पोपटराव पटारे, मा. प्राचार्य जयकर मगर, तंटामुक्तीचे अध्यक्ष आबासाहेब रणनवरे, श्रीधर गाडे, भैय्या पठाण आदी सह गावातील मान्यवर पदाधिकारी व अध्यात्मिक धार्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी जास्तीत जास्त आध्यात्मिक धार्मिक क्षेत्रातील सेवार्थींनी प्रमाणपत्र वाटपाचा लाभ घ्यावा व कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष अर्जुन राऊत, उपाध्यक्ष संदीप पटारे व सर्व सदस्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments