जिल्हास्तरीय स्वरचित काव्य लेखन स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात

रुपाली भालेराव 


 लोणी : एस आर दळवी फाउंडेशन व टीचर फोरम यांनी अहिल्यानगर यांच्या वतीने शिक्षकांसाठी १५ ऑगस्ट निमित्त आयोजित जिल्हास्तरीय स्वरचित काव्य लेखन स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ अहिल्यानगर येथील हॉटेल सुवर्णम प्राईड येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमास महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी, गीतकार व गझलकार रज्जाक शेख प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच कवी रुपचंद शिदोरे, कवी नाना डोंगरे यांच्यासह साहित्यप्रेमींची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करून करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक टीचर फोरम चे जिल्हाध्यक्ष सतीश मुन्तोडे यांनी केले. यावेळी त्यांनी एस आर दळवी. फाउंडेशनचे ध्येय, उद्दिष्टे तसेच शैक्षणिक, सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांची माहिती दिली.
स्पर्धेसाठी निसर्ग संवर्धन, प्रदूषणमुक्ती, वसुंधरा संरक्षण आणि पर्यावरण हे विषय देण्यात आले होते. सहभागी कवी-कवयित्रींनी या विषयांवर आपल्या स्वरचित कविता सादर करून पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश दिला.
स्पर्धेचे परीक्षण डॉ. कैलास दौंड, (प्रतिष्ठित कवी व लेखक), रज्जाक शेख( प्रसिद्ध कवी, गीतकार, गझलकार ) आणि वसुधा नाईक, प्रसिद्ध कवयित्री पुणे यांनी केले.
स्पर्धेत कवी डॉ. गवाजी बी. बळीद जि प प्राथमिक शाळा चापाडगाव ता. शेवगाव यांनी ‘निसर्गाचे संविधान’ या कवितेसाठी प्रथम क्रमांक पटकावला. कवी शशी त्रिभुवन जि. प. प्राथमिक शाळा बाभळेश्वर ता. राहाता यांच्या ‘वसुंधरेसाठी स्वातंत्र्य’ आणि कवयित्री उज्वला विलास पंडित जि. प. प्राथमिक शाळा राशीन मुले ता. कर्जत यांच्या ‘अभंग वृक्ष संवर्धन’ या कवितांना संयुक्त द्वितीय क्रमांक मिळाला. कवी संदीप रासकर जि. प. पवारवस्ती ता. श्रीगोंदा यांच्या ‘चल पाहू या माझं शेत’ या कवितेला तृतीय क्रमांक मिळाला.
उत्तेजनार्थ पुरस्कारासाठी कवी नवनाथ वाळके यांच्या ‘झाड बोले’ आणि कवयित्री रेखा नामदेव दहातोंडे यांच्या ‘वसुंधरा’ या कवितांची निवड करण्यात आली.
यावेळी सर्व सहभागी कवी-कवयित्री तसेच विजेत्यांचा मानाचा फेटा, मेडल, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
प्रमुख अतिथी रज्जाक शेख यांनी महाराष्ट्र राज्यस्तरीय स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त केलेले आपले गीत सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन प्रसिद्ध सूत्रसंचालक संदीप रासकर यांनी केले, तर राहाता तालुका टीचर फोरम अध्यक्ष राजू बनसोडे यांनी आभार मानले.
या उपक्रमास अहिल्यानगर टीचर फार्मची जिल्हा कार्यकारिणी, तालुका कार्यकारिणीचे पदाधिकारी, सदस्य तसेच अहिल्यानगर, राहाता, पाथर्डी, श्रीगोंदा, कर्जत, कोपरगाव, श्रीरामपूर, राहुरी, संगमनेर आदी तालुक्यांतील कवी-कवयित्री व साहित्यप्रेमी उपस्थित होते.
कवितेच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देतानाच शिक्षकांमधील साहित्यिक प्रतिभेला व्यासपीठ मिळवून देणारा हा उपक्रम ठरला. स्पर्धेतील सहभागी कवी कवयित्री 
राजू उदमले सर -अहिल्यानगर 
सचिन चव्हाण सर- पाथर्डी
डॉ.संदीप तापसे सर- राहाता
 स्मिता माघाडे मॅडम -राहाता
देवयानी म्हंकाळे मॅडम- राहाता,.शारदा गोरे मॅडम -श्रीगोंदा
.शबनम खान मॅडम- कोपरगाव 
शिल्पा शेंडे मॅडम- राहाता
 सुनीता शिंदे मॅडम- श्रीगोंदा 
सोनाली रसाळ मॅडम -कर्जत 
श्रीम.शुभांगी भालेकर मॅडम- कर्जत 
.स्वाती काळे मॅडम -श्रीगोंदा 
.कार्ले सुवर्णमाला मॅडम -अहिल्यानगर ,चंदा गायकवाड मॅडम -राहाता 
श्रीम.क्रांती करजगीकर मॅडम- अहिल्यानगर 
.सना पठाण मॅडम -श्रीरामपूर 
.सना खान मॅडम -श्रीरामपूर 
अमरीन शेख मॅडम- श्रीरामपूर 
 सोहनी पुरनाळे मॅडम -अहिल्यानगर 
कविता तळोले मॅडम -राहुरी
.नसीम शेख मॅडम- अहिल्यानगर 
.संदीप कोरडे सर -राहाता 
 शशिकांत गमे सर -संगमनेर
 .नीलिमा गुणे मॅडम -संगमनेर 
 .पोपटभाऊ सांगळे- केज बीड
 श्विजय सरदार सर- खामगाव
स्पर्धेतील विजेत्यांचे व सहभागी सर्व कवी-कवयित्रींचे आयोजकांकडून हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

Post a Comment

0 Comments