जि.प.प्रा.शाळा संकुल लोणी येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न*


  लोणी. :-( रूपाली भालेराव ) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा -लोणी मुले,मुली व उर्दु ता.राहाता येथे भारतीय स्वातंत्र्याच्या 80 वा.स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.जिल्हा परिषद अहिल्यानगरच्या कर्तव्यदक्ष मा.अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पा.यांचे शुभहस्ते सकाळी 7:45 वा.ध्वजारोहन झाले. सौ.विखे मॅडम यांचे शुभहस्ते विविध स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यात आले‌.
सौ.शालिनीताई विखे यांनी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देऊन प्रत्येकाने देशासाठी आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिली, देशाला स्वातंत्र्य मिळवून देणा-या पूर्वजांचे स्मरण कायम स्वरुपी लक्षात ठेवावे,व देश प्रगतीसाठी आवश्यक असणा-या गोष्टी करण्याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले.
      प्रसंगी संगीत कवायत, बक्षीस वितरण,मुलांची भाषणे,खाऊ वाटप करण्यात आले.श्री.रमेश वैद्य सर, प्रवीण कपाटे, बाळासाहेब उगले यांचेकडून मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
  कार्यक्रमाचे अध्यक्ष पद्मश्री डॉ.वि.विखे पा.सह.साखर कारखान्याचे संचालक श्री.संजय सोपान आहेर पा.यांनी भूषविले.या कार्यक्रमासाठी सरपंच श्रीम.कल्पना मैड पं.स.सदस्य श्री.संतोष ब्राह्मणे, केंद्रप्रमुख श्री.विठ्ठल रंधे,श्री.अशोक बिडवे साहेब,सी.एम.विखे,अशोक कोरडे, बाळासाहेब चव्हाण, शा.व्य.समिती अध्यक्ष मोहन आहेर,सौ.ज्योती विखे,ग्राम.सदस्या सौ.सिंधुताई म्हस्के,सौ.सुनिता चव्हाण श्री.रंगनाथ खेमनर इ.उपस्थित होते.
   याप्रसंगी माजी विद्यार्थी,पालक, ग्रामस्थ, विद्यार्थी,शिक्षक-शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री.गोरक्षनाथ चव्हाण यांनी केले तर सूत्रसंचालन श्री.ज्ञानदेव कोकणे सर व सौ.सुनिता थोरात मॅडम यांनी केले. तर श्रीम.रेश्मा वाजे मॅडम यांनी आभार प्रदर्शन केले.
 सत्तेचा महासंग्राम--
 प्रतिनिधी-- रूपाली भालेराव 
 सहसंपादक -- साबळे ज्ञानेश्वर

Post a Comment

0 Comments