दिलीप शिंदे
सोयगाव दि.१२- पहाटे पासूनच सोयगाव तालुक्यात रिमझिम पावसाने सुरुवात केल्याने सोयगाव बनोटी रस्त्यावर चिखल झाल्याने सोयगाव जवळ असलेल्या विद्युत केंद्राजवळ बुधवारी सोयगाव आगाराची घोसला सोयगाव ही बस चिखलात अडकल्याने प्रवाशांना मोठ्या समस्येला तोंड देत एक किलोमीटर पायपीट करीत सोयगाव बसस्थानक गाठावे लागले होते.
अर्धा किलोमीटर अंतरावर सोयगाव आगार असताना प्रवाशांना तात्काळ बस उपलब्ध करून देता आली असती मात्र आगारप्रमुखांच्या निष्काळजी पणामुळे प्रवाशांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागल्याने प्रवाशांनी आगार आगाराच्या गलथान कारभाराविषयी संताप व्यक्त केला होता.
याबाबत सविस्तर माहिती अशी, नागद - सोयगाव- फर्दापूर या राज्य महामार्ग क्रमांक २४ चे रस्ता नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून . या रस्त्याच्या कामा दरम्यान पर्यायी रस्त्याने ठेकेदाराने भाडेतत्त्वावर लावलेले हायवा ओव्हर लोड गौण खनिज वाहतूक करीत असल्याने मोठमोठे खड्डे पडले असून मोठ्या प्रमाणात चिखलमय झाला आहे. या चिखलात विद्युत केंद्राजवळ सोयगाव आगाराची एम एच २० बीएल २३२७ ही घोसला -सोयगाव बस घोसल्याकडून सोयगाव कडे येत असताना बुधवारी विद्युत केंद्राजवळ चिखलात अडकली होती.चालकाने प्रयत्नांची पराकाष्ठा केली असता बस चिखलातून निघत नव्हती. संतप्त वयोवृद्ध महिला, पुरुष,शाळकरी मुले,महाविद्यालयीन तरुण,तरुणी यांनी रस्त्यावरील चिखल तुडवीत एक किलोमीटर असलेल्या बसस्थानकाचा रस्ता धरला होता. मात्र बस चिखलात अडकली त्या ठिकाणापासून अर्ध्या किलोमीटर अंतरावर सोयगाव आगार होते. आगारातून प्रवाशांच्या सेवेसाठी तत्काळ बस उपलब्ध करण्यात आली नसल्याने प्रवाशांनी सोयगाव आगाराच्या गलथान कारभाराविषयी संताप व्यक्त केला होता. वाहनधारकांना होणाऱ्या समस्येकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी वाहनधारक व प्रवाशांमधून केली जात आहे.
0 Comments