लोणी : प्रतिनिधी
भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून एस. आर. दळवी फाउंडेशन आणि अहिल्यानगर टीचर फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील शिक्षकांसाठी 'स्वरचित काव्यलेखन स्पर्धे'चे आयोजन करण्यात आले आहे. शिक्षकांमधील सृजनशीलतेला वाव देण्याच्या उद्देशाने आयोजित या स्पर्धेसाठी 'हरित भारताचे स्वप्न' आणि 'वसुंधरेसाठी स्वातंत्र्य' हे दोन विषय निश्चित करण्यात आले आहेत.
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या शिक्षकांना पर्यावरण संवर्धन, वृक्षसंवर्धन, प्रदूषणमुक्ती, प्लास्टिकमुक्त भारत, वृक्षतोडीपासून मुक्त निसर्ग आणि भविष्यातील स्वच्छ व सुंदर भारत अशा विविध विषयांवर कविता सादर करावयाच्या आहेत. स्पर्धेतील नियम अत्यंत स्पष्ट असून, कविता पूर्णपणे स्वरचित असणे बंधनकारक आहे. कोणत्याही काव्यलेखन प्रकारातील कॉपी केलेली किंवा यापूर्वी प्रकाशित झालेली कविता स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जाणार नाही. काव्य लेखनाबाबत नियम घालून देण्यात आले असून, कवितेत किमान १६ ओळी आणि जास्तीत जास्त २४ ओळी असणे आवश्यक आहे. तसेच, कविता अश्लील, मार्विक किंवा जातीय तेढ निर्माण करणारी नसावी, याची खबरदारी घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. स्पर्धेचा अंतिम निर्णय परीक्षकांचा राहील.
ही स्पर्धा १० ऑगस्ट ते २० ऑगस्ट २०२४ या कालावधीत संपन्न होणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व शिक्षकांना आकर्षक 'सॉफ्ट कॉपी' प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. याशिवाय, प्रथम तीन विजेत्यांना आकर्षक बक्षिसे, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार असून, दोन उत्तेजनार्थ बक्षिसेही दिली जाणार आहेत. शिक्षकांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन टीचर फोरमचे राज्य उपाध्यक्ष श्री. अभिजित दळवी, जिल्हाध्यक्ष श्री. सतीश मुन्तोडे, श्री. राजू बनसोडे, श्री. विजय नलगे, श्री. योगेश भगत, श्री. राजेंद्र बोकंद, श्री. विवेकानंद खामकर, श्री. पंढरीनाथ वाघाडे, श्री. समीर यादव, श्रीम. सुनीता इंगळे, श्रीम. कविता तळोले, श्रीम. छाया पोटरे, श्री. संतोष हेकरे, श्री. राजेंद्र जाधव, श्रीम. देवयानी म्हंकाळे, श्रीम. वेरोनिका अवसरमाल, श्रीम. सुवर्णा लहिरे, श्रीम. दीपा सातपुते, श्री. विकास चौधरी, श्री. भाऊसाहेब जगताप, श्री. तुषार दळवी, श्रीम. रोहिणी नलगे, श्रीम. सुप्रिया देशमुख, श्री. सतीश अंधारे, श्री. रावसाहेब जाधव, श्री. सोमनाथ अनाप आणि श्री. गीताराम पवार यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
सत्तेचा महासंग्राम -( प्रतिनिधी रूपाली भालेराव )
सहसंपादक -- साबळे ज्ञानेश्वर
0 Comments