शिर्डी येथे श्री साई सतचरित्र पारायणास मोठ्या उत्साहात सुरुवात! सुमारे आठ हजार पेक्षा जास्त महिला व पुरुष वाचकांनी नोंदवला सहभाग!

शिर्डी( प्रतिनिधी)-
 श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डी, नाट्य रसिक मंच, शिर्डी आणि शिर्डी ग्रामस्‍थ यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने गुरुवार दिनांक १३ ऑगस्‍ट, २०२६ ते गुरुवार दिनांक २० ऑगस्‍ट २०२६ या कालावधीत चालणा-या श्री साईसच्चरित पारायण सोहळ्याला आज 13 ऑगस्ट गुरुवार रोजी मंगलमय वातावरणात सुरुवात झाली असून, या पारायण सोहळ्यात अंदाजे ०५ हजार हुन अधिक महिला व ०३ हजार हुन अधिक पुरुष असे सुमारे ०८ हजार पेक्षा अधिक पारायणा‍र्थींनी सहभाग घेतला.
 आज सकाळी समाधी मंदिरातून श्रींच्‍या श्री साईसच्‍चरित या पवित्र ग्रंथाची व फोटोची हनुमान मंदिर व व्‍दारकामाई मार्गे साईआश्रम भक्‍तनिवास येथील पारायण मंडपापर्यंत सवाद्य मिरवणूक काढण्‍यात आली. या मिरवणूकीत संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी पोथी, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी विणा तर प्रशासकिय अधिकारी संदिपकुमार भोसले व प्र. कामगार अधिकारी शरद डोखे यांनी श्रींची प्रतिमा व मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्‍या सुविद्य पत्‍नी सौ. वंदना गाडीलकर यांनी कलश घेवून सहभाग घेतला. यावेळी मंदिर प्रमुख विष्‍णु थोरात, नाटय रसिक मंचाचे पदाधिकारी, मंदिर पुजारी, संस्‍थानचे कर्मचारी, ग्रामस्‍थ व साईभक्‍त मोठ्या संख्‍येने उपस्थित होते. 
 मिरवणूक पारायण मंडपात आल्‍यानंतर संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व मान्‍यवरांच्‍या हस्‍ते ग्रंथ व कलश पूजन करुन, श्री साईसच्‍चरित पारायण वाचनाचा शुभारंभ करण्‍यात आला. सकाळी ०७.०० ते ११.३० पुरूष वाचक व दुपारी ०१.०० ते ०५.३० महिला वाचक यांचे यावेळेत श्री साईसच्‍चरिताचे वाचन करण्‍यात आले. तसेच सकाळी १०.०० ते ११.३० यावेळेत ब्राम्‍हण एकता मंच, शिर्डी यांचे विष्‍णु सहस्‍त्रनाम पठण कार्यक्रम, दुपारी ०१.०० ते ०३.०० यावेळेत श्री साईबाबा कन्‍या विद्या मंदीर, शिर्डी शाळेच्‍या विद्यार्थीनींचा सांस्‍कृतिक कार्यक्रम व दुपारी ०३.०० ते ०५.०० यावेळेत श्री साईबाबा इंग्‍लीश मिडीयम स्‍कुल, शिर्डी (प्राथमिक विभाग) यांचा सांस्‍कृतिक कार्यक्रम गेट क्र. ३ समोरील श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्‍दी मंडपात संपन्‍न झाला. तर, सायं. ०५.०० ते ०६.०० यावेळेत प्रा. श्री. सुनिल कांडेकर सर यांचे श्री साई चरीत्र ग्रंथ प्रवचन सेवा संपन्न झाली. रात्रौ. ०७.३० ते ०९.३० यावेळेत ह.भ.प. कु. ओंकार महाराज बोचरे, श्री ज्ञानेश्‍वर महाराज मंदीर, निमगाव को-हाळे, यांचे किर्तन आहे. या सर्व कार्यक्रमांचा साईभक्त तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने लाभ घेत येते.

Post a Comment

0 Comments