एन सी यु आय चे संचालक कडू यांच्याशी सेवा संस्थेच्या योजना बाबत चर्चा



टाकळीभान(प्रतिनिधी)—भारतीय राष्र्टीय सहकारी संघ, नवी दिल्ली (एन सी यु आय) चे संचालक नकुल कडू यांच्याशी सहकारी सोसायटी संबधी विविध योजना राबविण्यासंदर्भात विशेष चर्चा झाली असल्याचे टाकळीभान सेवा संस्थेचे अध्यक्ष राहुल पटारे यांनी सांगीतले. यावेळी कडू यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

श्रीरामपूर येथे नकुल कडू यांनी सिध्दीविनायक मल्टीस्टेटला भेट दिली त्याप्रसंगी टाकळीभान वि.वि.कार्य.सोसायटीचे अध्यक्ष राहुल पटारे, संचालक अविनाश लोखंडे, सुधिर मगर, वासुदेव काळे (उत्तर जिल्हा अध्यक्ष सहकार भारती अहिल्यानगर) महेंद्र खडके(सहकार भारती सहसंघटक प्रमूख उत्तर जिल्हा) आदी उपस्थित होते.
याप्रसंगी सहकारी सोसायटी संबधी विविध योजना राबविण्याबाबत कडू यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली.

Post a Comment

0 Comments