दिलीप शिंदे
सायगाव दि.२२-- क्रांती जनहित बहुउद्देशीय विकास संस्था आमखेडा संचलित अंजनाई गोशाळा निर्मित गोमय उत्पादन विक्री केंद्राचा राष्ट्रीय खेळाडू, उपजिल्हा प्रमुख तथा जिल्हा बँकेचे संचालक आबासाहेब काळे, सोयगाव पोलिस ठाण्याचे सपोनी दिनकर गोरे यांच्या हस्ते दि.२२ शनिवारी सकाळी ११:३० वाजता शुभारंभ करण्यात आला.
यावेळी पंचायत समिती सदस्या श्रीमती जयश्री गजानन पवार,आमखेडा सरपंच श्रीमती नंदाबाई संजय आगे, जगदंबा माता गो रक्षण सिद्ध पिठ चॅरिटेबल ट्रस्ट चे संचालक विनोद कोकाटे,कृषिभूषण अरुण सोहनी, गो सन्मान अभियान प्रचारक भगवान शेळके, संतोष तोतला,काकासाहेब कदम,संतोष सोनवणे व एकनाथराव कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.शहरात प्रथमच गोमय गणपती , धूप बत्ती, गोमय राखी,गोमय जप माळा,श्री यंत्र,पणती, पिडांतक तेल, गोवरी आदी गोमय उत्पादने विक्री केंद्राचा शुभारंभ करण्यात आला.या कार्यक्रमास भाजपा तालुकाध्यक्ष संजय पाटील, रमेश गव्हांडे,संजय आगे,समर्पण फाऊंडेशन चे हर्षल फुसे (हिंदू), पत्रकार बाळू शिंदे,नायब तहसीलदार राहुल पत्रिके,मयुर मनगटे, प्रा. डॉ.निलेश गाडेकर, गणेश कापरे,पोलिस कर्मचारी गजानन दांडगे,पोलिस पाटील अंबादास ढगे,डॉ.रघुनाथ फुसे,किरण पाटील, प्रतापराव सोळंके,अरुण काळे,विजय गव्हाड, केयुर पानसर,देवेंद्र तेलंगरे,अक्षय पवार, अक्षय विसपुते,भागवत दणके,प्रभाकर नागपुरे,भगवान दणके,अशोक सोनवणे आदींसह संस्थेचे अध्यक्ष संदीप इंगळे, उपाध्यक्ष ईश्वर इंगळे,सचिव दिलीप शिंदे,सहसचिव अनिल लोखंडे,कोशाध्यक्ष उर्मिला इंगळे,संचालक ज्ञानेश्वर गाडेकर,अशोक ढगे,संचालिका पद्माबाई शिंदे,रुपाली लोखंडे,मीना गाडेकर,शारदा इंगळे,आदी उपस्थित होते
0 Comments