टाकळीभान प्रतिनिधी-न्यू इंग्लिश स्कूल टाकळीभान या विद्यालयात दिनांक 20 ऑगस्ट 2026 रोजी ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय या ठिकाणावरून ब्रह्मकुमारी मंदा दीदी ब्रह्मकुमारी छाया दिदी व ब्रह्मकुमारी हेमलता दीदी त्याचबरोबर कोकाटे दादा यांनी विद्यालयांमध्ये व्यसनमुक्ती अभियानांतर्गत सर्व विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ दिली, याप्रसंगी ब्रह्मकुमारी हेमलता दीदी यांनी विद्यार्थ्यांना व्यसनाधीनतेमुळे होणारे दुष्परिणाम समजावून सांगितले,
तसेच ब्रह्मकुमारी मंदादीदी यांनी विद्यार्थ्यांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि आयुष्यात कधीच व्यसन करू नये असा संदेश दिला त्याच बरोबर कोकाटे दादा यांनी ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय याची स्थापना आणि उद्देश याबद्दल माहिती दिली तर ब्रह्मकुमारी छाया दीदी ब्रह्मकुमारी मंदादीदी ब्रह्मकुमारी हेमलता दीदी व कोकाटे दादा यांनी विद्यालयातील सर्वच विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ दिली तसेच न्यू इंग्लिश स्कूल व अण्णासाहेब पटारे पाटील कनिष्ठ महाविद्यालय टाकळीभान या दोन्ही विद्यालयाला व्यसनमुक्तीची शपथ घेतल्याबद्दल प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले
0 Comments