शिर्डी (प्रतिनिधी)-
श्री साईबाबा इंग्लिश मिडियम स्कूल, शिर्डी येथे शिक्षकांना आधुनिक व विद्यार्थी-केंद्रित अध्यापन पद्धतींचे प्रशिक्षण देण्यासाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. जिल्हा समन्वयक (रतलाम, मध्य प्रदेश) तथा साई श्री इंटरनॅशनल अकॅडमीच्या प्राचार्या डॉ. श्वेता विंचूरकर यांनी या कार्यशाळेस मार्गदर्शन केले.
कार्यशाळेत NEP 2020, NCF 2023, competency-based, experiential व activity-based learning, formative assessment तसेच २१व्या शतकातील कौशल्यांवर मार्गदर्शन करण्यात आले. केजी ते माध्यमिक स्तरावरील शिक्षकांना विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविणे, कृतीआधारित शिक्षण, भावनिक व सामाजिक विकास आणि शिक्षकाची learning facilitator म्हणून भूमिका याविषयी प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देण्यात आले.
केजी शिक्षकांसाठी ECCE, Panchakosha Vikas, foundational literacy व numeracy, play-based learning आणि I Do–We Do–You Do या अध्यापन तंत्रांचा वर्गातील प्रभावी वापर समजावून सांगण्यात आला.
ही कार्यशाळा श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर यांच्या मार्गदर्शनातून आयोजित करण्यात आली. “शिक्षक बदलला, तर अध्यापन बदलते; अध्यापन बदलले, तर विद्यार्थ्यांचे भविष्य बदलते.” या विचारातून शिक्षकांना नव्या शैक्षणिक दृष्टिकोनाशी जोडण्याचा या प्रशिक्षणाचा प्रयत्न असल्याचे प्राचार्या डॉ. श्वेता विंचूरकर यांनी यावेळी नमूद केले.
0 Comments