सावळीविहीर ते अहिल्यानगर महामार्गाच्या चांगल्या कामासाठी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांची अर्ध नग्न अवस्थेत अहिल्यानगर कडे पायी दिंडी!

शिर्डी (प्रतिनिधी)-
सावळविहिर फाटा ते अहिल्यानगर हा महामार्ग पुढे काम चालू ,मागे खड्डे पडत असल्यामुळे व धुळीचे साम्राज्य होत असल्यामुळे त्याचा सर्वांनाच त्रास होत असून अशा रस्त्या मुळे रस्त्याच्या कडेचे दुकानदार,येणारे जाणारे तसेच रस्त्याच्या परिसरातील सर्वच जण रस्त्याच्या या त्रासाला त्रस्त झाले असून मानसिक व आर्थिक दृष्टीनेही खचले आहेत. जिल्ह्यातील या महामार्गाच्या 
कडेचे अनेक दुकानदार भिकेला लागले आहेत. आर्थिक दृष्टीने पूर्ण नग्न झाले आहेत. त्यामुळे त्यांचा एक प्रतिनिधी म्हणून आपण अर्ध नग्न अवस्थेत सावळीविहीर फाटा ते अहिल्यानगर असा पायी प्रवास निषेध म्हणून करत असून संबंधित नॅशनल हायवेने आपणास हा चांगला महामार्ग करण्यासंदर्भात व यापुढे मार्गावर खड्डे पडणार नाहीत. असे लेखी द्यावे. अन्यथा आपले हे आंदोलन असे चालू राहणार असे सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी म्हटले आहे. 

सामाजिक कार्यकर्ते संजय काळे हे मंगळवार 25 ऑगस्ट 2026 रोजी
 सावळीविहीर फाटा येथून फक्त हाफ पॅंटीवर अंगात बनियनही न घालता पाठीवर फलक लावून पायी अहिल्यानगर कडे निघाले आहेत. या संदर्भात ते म्हणाले की, सावळी विहीर फाटा ते अहिल्यानगर हा रस्ता पुढे काम व मागे खड्डे पडत आहेत. तो चांगल्या पद्धतीने व्हावा ,खड्डे पडणार नाही याची हमी संबंधित कंपनीने व नॅशनल हायवेने द्यावी यासाठी आपण शांततेने निषेध नोंदवत अर्ध नग्न अहिल्यानगर कडे जात असून माझे वय 65 असल्यामुळे आपण दररोज दहा ते बारा किलोमीटर अंतर पायी चालणार आहे. असे सांगत आपण श्री साईंच्या नगरीत आहोत. श्री साईबाबांचा आपण प्रामाणिक श्वान आहे. चोर आल्यानंतर कुत्रा चोरावर भुंकतो. ओरडतो. तसा मीही या रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार व हेराफेरी, चोरी करणाऱ्यांवर बोलत आहे. ओरडत आहे. त्यामुळे कोण काय म्हणतो याची तमा आपण बाळगत नाही. प्रामाणिकपणे हा रस्ता चांगला व्हावा यासाठी हे आंदोलन आहे. या रस्त्यासाठी जुने नवे सर्वच जबाबदार आहेत. जबाबदार कोण? यापेक्षा हा रस्ता होणे गरजेचे आहे. येथे कुणीतरी पुढे व्हावं असं सर्वांना वाटतं मात्र दहशतीमुळे कुणी पुढे येत नाही. ही एक मोठी शोकांतिका आहे. असे त्यांनी यावेळी सांगत सावळी विहीर फाटा ते अहिल्यानगर हा रस्ता
 साईबाबा संस्थान कडे कायम स्वरुपी हस्तांतरीत व्हावा.
हा रस्ता सहा पदरी होऊन संपूर्ण कॉंक्रीटीकरण व्हावा.
दोन्ही बाजूने पालखी मार्ग विकसित व्हावे..
रस्त्याचे दुतर्फा वृक्ष लागवड व्हावी..
सावळीविहीर फाटा ते अस्तगाव किंवा निर्मळ पिंपरी पर्यंत स्ट्रीट लाईट व्हावेत.
रस्त्यावर साईबाबांचे जीवनपटाचे दृष्याचे फलक असावे.
साईबाबांची निवडक घोष वाक्य ह्या अंतरात डीजिटल बोर्ड वर असावे.
सदर अंतरात सिसिटीव्ही ची चोवीस तास निगराणी असावी.
सदरचा रस्ता अत्यंत हायटेक तंत्रज्ञानाने व मजबूत बनवण्यात यावा.व रोमन टोर्मट, लार्सन टुब्रो अथवा इतर नामांकित व साईभक्तीचे ठेकेदार कंपनी मार्फत हा रस्ता बनवावा. असेही यावेळी‌ अर्ध नग्न अशा अवस्थेत अहिल्यानगर कडे पायी जात असणारे सामाजिक कार्यकर्ते संजय बबुताई भास्करराव काळे यांनी म्हटले आहे. रस्त्याने त्यांना अनेक जण भेटून पाठिंबा देत आहेत, शुभेच्छा देत आहेत.

Post a Comment

0 Comments