पांडुरंगाच्या चरणी लीन होण्यास चाललो याची जाणीव मनात ठेवल्यास कोणत्याही नियमावलींची गरजच भासत नाही... हभप श्री संजयजी महाराज


वैजापूर (प्रतिनिधी)
इतर दिंडयाप्रमाणे कोणत्याही नियमांची मर्यादा न लावता आपण सर्व भगवान 
पांडुरंगाच्या चरणी लीन होण्यास चाललो याची जाणीव मनात ठेवल्यास कोणत्याही नियमावलींची गरजच भासत नाही... हभप श्री संजयजी महाराज
 आषाढी कार्तिकी भक्तजन येती 
व साधूजण येती......
दिंड्या पताका वैष्णव नाचती 
याप्रमाणे आषाढी एकादशीच्या महापर्वावर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बरेच दिवसापासून पायी दिंडीची आस लागलेल्या वारकऱ्यांच्या दिंडीचे प्रस्थान चालू आहे .

 अशा रीतीने श्रीक्षेत्र भऊर ते श्री क्षेत्र पंढरपूर या पायी दिंडीचे रविवार दि १२.८.२०२६ रोजी भक्ती व आनंदमय अशा वातावरणात मोठ्या उत्स्फूर्तपणे प्रस्थान झाले 
 प्रारंभी हभप श्री संजयजी महाराज यांनी ग्रामदेवता भगवान रोकडेश्वर महाराज, भवानी मातेचे व दिंडी रथाचे पूजन केले व रूप पाहता लोचनी म्हणत दिंडीच्या भजनाला सुरुवात केली.
 आपला महाराष्ट्र हा कष्टकरी व शेतकऱ्यांचा महाराष्ट्र आहेत आणि शेतकऱ्यांच्या परिस्थितीची जगदगुरु तुकाराम महाराज यांना पुर्णपणे जाणीव होती त्यातुनच त्यांनी त्या काळात त्यांचे कर्जही माफ केले होते आणि असे जगदगुरु तुकाराम महाराज कि, बाबांनो तुम्हाला जरी तुम्हाला जाता आले तरी काही अडचण नाही मात्र दिंडीला जाणाऱ्या वारकऱ्यांची बोळवण (वाटी लावणे) केल्याशिवाय रहावू नका आणि अशा बोळवण करणाऱ्यांना मी लोटांगण गालतो
 आणि अशाच न्यायाने दिंडीला वाटी लावणेकामी आदरणीय ॲड श्री प्रमोद दादा जगताप, श्री सारंगधर आण्णा जगताप, गावातील सर्वच मान्यवर व गावकरी मोठ्या प्रमाणात वाटी लावणेकामी हजर होते तसेच मर्चंट बँकेतील कर्मचारी व पंचक्रोशीतील देखील भाविक हजर होते.
 तत्पूर्वी ॲड श्री प्रमोद दादा जगताप, श्री सारंगधर आण्णा जगताप, सौ.रंजनाबाई सारंगधर जगताप व सरपंच श्री कल्याणराव सारंगधर जगताप यांनी भगवान रोकडेश्वर, भवानी माता, दिंडी रथ व हभप श्री संजयजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून दिंडीला शुभेच्छा दिल्या तसेच पांडूरंगाच्या सेवेत दिंडीला जाणाऱ्या सर्वच वारकऱ्यांची योग्य ती काळजी घेऊन हभप श्री संजयजीl महाराज यांना सहाय्य करा असे आदरणीय ॲड श्री प्रमोद जगताप यांनी दिंडीच्या नियोजनातील महाराजांचे निकटवर्तीय श्री बाळू काका जगताप व मच्छू दादा जगताप यांना सांगितले ‌
          

Post a Comment

0 Comments