टाकळीभान प्रतिनिधी- प्रवरा मेडिकल ट्रस्ट, माजी सभापती नानासाहेब पवार प्रतिष्ठान, टाकळीभान विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी आणि टाकळीभान ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने टाकळीभान येथे आज दिनांक १९ रोजी आयोजित केलेल्या मोफत सर्व रोग निदान व उपचार शिबिराचा ३७५ नागरिकांनी लाभ घेतला आहे.
येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित केलेल्या या शिबीराचे उदघाटन माजी सभापती नानासाहेब पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अशोक कारखान्याचे माजी संचालक भाऊ थोरात, माजी सरपंच चित्रसेन रणनवरे, रमेश दादा धुमाळ, उपसरपंच कान्हा खंडागळे, टाकळीभान सोसायटीचे चेअरमन राहूल पटारे, माजी चेअरमन एकनाथ पटारे, युवानेते भाऊसाहेब पवार, सुधीर मगर, भाजपाचे नारायण काळे, मुकुंद हापसे, अक्षय कोकणे तसेच अनिल दाभाडे, संजय पवार, नानासाहेब लेलकर, विलास सपकाळ, बाळासाहेब शेळके, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डाॅ. राम बोरूडे आदी उपस्थित होते.
या शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची मोफत तपासणी करून मोफत औषधोपचार करण्यात आले. तसेच शिबिरस्थळी पात्र नागरिकांना 'आयुष्मान भारत कार्ड' देखील काढून देण्यात आले.
या शिबीरासाठी पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील व प्रवरा मेडिकल ट्रस्टचे चेअरमन डाॅ. राजेंद्र विखे पाटील यांचे सहकार्य लाभले.
0 Comments