टाकळीभान प्रतिनिधी-टाकळीभान येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या सन २००३-०४ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेबद्दलची कृतज्ञता कृतीतून व्यक्त केली आहे. विद्यार्थी वसतिगृहाला फ्रिज भेट देतानाच शाळेसाठी ७,५०० लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचे कामही सुरू केले आहे.
टाकळीभान येथील न्यू इंग्लिश स्कूल व कै. आण्णासाहेब पटारे पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या सन २००३-०४ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी श्रीमती अहिल्यादेवी होळकर विद्यार्थी वसतिगृहाला फ्रिज भेट दिला.
यापूर्वी झालेल्या स्नेहमेळाव्यात माजी विद्यार्थ्यांनी शाळेसाठी ७,५०० लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उभारण्याचा आणि वसतिगृहाला फ्रिज देण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन होऊन बांधकाम सुरू असून, फ्रिजही वसतिगृहाला सुपूर्द करण्यात आला.
माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते वसतिगृहाचे अधीक्षक सुरेश गलांडे यांच्याकडे फ्रिज सुपूर्द करण्यात आला. यावेळी संभाजी पटारे आणि सागर रणवरे यांनी मनोगत व्यक्त केले, तर सुरेश गलांडे यांनी माजी विद्यार्थ्यांचे आभार मानले.
कार्यक्रमाला किरण जाधव, दिलीप पवार, संदीप तुपे, सुनील शेजुळ, विनायक बोरुडे, अरुण वाकडे, निलेश म्हस्के, कृष्णा तुपे, रवी मेहेत्रे, विलास पटारे, दीपक रणनवरे, महेश मगर, मोहन गाढे, अशोक शेंडे तसेच विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर रणवरे यांनी केले.
0 Comments