स्व.साहेबराव घाडगे पाटील यांच्या ७३ व्या जयंतीचे निमित्ताने वृक्षारोपण करून खर्‍या आदरांजली

दिलीप लोखंडे 

टाकळीभान(प्रतिनिधी)—घोगरगाव येथील त्रिमूर्ती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात 
याप्रसंगी व्यासपिठावर घोगरगाव येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामराव बहिरट, प्रा.संतोष जावळे,  पत्रकार दिलीप लोखंडे,विजय देवळालकर, अशोक रणनवरे, संदीप बोडखे, बापूसाहेब नवले, नवीनच पोलीस भरती झालेले विठ्ठल ढवळे, आण्णासाहेब पटारे, महेंद्र शेळके, प्रशांत बहिरट आदी उपस्थित होते.

याप्रसंगी बापूसाहेब नवले म्हणाले की, घोगरगावसारख्या छोट्याश्या खेडेगावात साहेबराव घाडगे पाटील यांनी त्रिमूर्ती विद्यालयाची स्थापना करून एकाच छताखाली विद्यार्थ्यांना सर्वच शाखांचे शिक्षण मिळवून दिले. आज रोजी श्रीरामपूर, नेवासा तालुक्यासह बाहेरील तालुक्यातील विद्यार्थीही या विद्यालयात शिक्षण घेत असल्याचे सांगीतले.
जिद्द, चिकाटी, अभ्यासाच्या जोरावर आपल्याला ज्या गोष्टी साध्य करायच्या आहेत. तसेच आपल्याला ध्येय गाठावयाचे असेल तर आपल्या कामात सातत्य असणे गरजेचे आहे. मी माझ्या सातत्य व जिद्द, चिकाटीच्या जोरावर पोलीस भरती झालो असून विद्यार्थ्यांनीही त्यांना ज्या क्षेत्रात जायचे असेल त्याबाबत प्रयत्नशिल असणे गरजेचे असल्याचे नवीनच पोलीस भरती झालेले विठ्ठल ढवळे यांनी यावेळी नमूद केले. तसेच शाळेसाठी दहा पुस्तके भेट देत असल्याचे जाहीर केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संस्थेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात येवून खर्‍या अर्थाने साहेबराव घाडगे पाटील यांना आदरांजली वाहण्यात आली. 
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन हरिश्चंद्र डिके व रेखा दिवे यांनी तर प्रास्तावीक अर्चना जगताप यांनी केले. आभार प्रा.संतोष जावळे व नितिन साळवे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments