श्री क्षेत्र आघार ता.मालेगाव येथील श्री सिद्धेश्वर महाराज पायी दिंडी सोहळ्याचे सावळीविहीर येथे जोरदार स्वागत!गेल्या 48 वर्षापासून दिंडीची अमरदीप संघटना व सावळी विहीर ग्रामस्थांच्या वतीने दरवर्षी अखंडित पणे केली जाते सेवा--ह भ प नानाभाऊ पुरुषोत्तम पगार महाराज

शिर्डी ( राजकुमार गडकरी)-
सालाबाद प्रमाणे यावर्षीही मालेगाव जवळील आघार येथील कै. पुरुषोत्तम महाराज पगार यांचा श्री सिद्धेश्वर पायी दिंडी सोहळा श्री क्षेत्र पंढरपूर कडे ह भ प नानाभाऊ महाराज पगार यांच्या मार्गदर्शनाखाली जात असताना सावळीविहीर बुद्रुक येथे आल्यानंतर या दिंडीचे जोरदार स्वागत करण्यात आले. विणेकरी हभप बापू महाराज पोवार तसेच ह भ प नानाभाऊ महाराज पगार यांना पुष्पहार घालून त्यांचा श्री पांडुरंगाच्या नामघोषात सन्मान करण्यात आला. 
   त्यानंतर या दिंडीचे श्री हनुमान मंदिरात आगमन झाल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. येथे दिंडी मार्गावर मंदिरासमोर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. श्री हनुमान मंदिराच्या सभा मंडपात दिंडीतील वारकऱ्यांची काही वेळ विश्रांती होऊन चहापाणी झाल्यानंतर हरिपाठ झाला. उभे रिंगण झाले. फुगड्या झाल्या. भगव्या पताका हातात घेऊन नाचत गात विठुरायाचा जयजयकार करण्यात आला. हरिपाठ झाल्यानंतर श्री व सौ बाबासाहेब जपे , श्री व सौ.सुनील वाघमारे आदींच्या हस्ते श्रींच्या पालखीचे व रथाचे पूजन करून आरती झाली.ह भ प बापू महाराज पोवार यांचे या वेळी प्रवचन झाले. यावेळी त्यांनी सांगितले की, कै. पुरुषोत्तम महाराज पगार यांनी गेल्या 48 वर्षांपूर्वी आघार येथून गावातील व परिसरातील वारकऱ्यांना पांडुरंगाचे आषाढी एकादशीला दर्शन व्हावे हा हेतू ठेवून सर्वांना एकत्रित आणून ही पायी दिंडी सुरू केली. अधिकाधिक वारकरी दिंडीच्या माध्यमातून धार्मिक व्हावे व त्यातून पांडुरंगाची भक्ती वाढवावी असा त्यांचा उद्देश होता. त्यावेळी एवढ्या सुविधा नव्हत्या, डोक्यावर बोजा घेऊन ही पायी दिंडी सुरू झाली होती. आता तिला मोठे स्वरूप आले आहे. मात्र पुरुषोत्तम महाराज अचानक गेल्या अकरा वर्षांपूर्वी देवाला प्रिय झाल्यानंतर दिंडीची धुरा त्यांचे पुत्र ह भ प नानाभाऊ पुरुषोत्तम पगार महाराज यांनी खांद्यावर घेतली. व आजतागायत खंड न पडता हा सिद्धेश्वर पायी दिंडी सोहळा दर आषाढी एकादशीसाठी श्री क्षेत्र पंढरपूर कडे जात असतो. या दिंडीचा सावळीविहीर बु.येथे मुक्काम असतो. सावळीविहीर ग्रामस्थ व अमरदीप संघटना गेल्या 48 वर्षापासून या दिंडीची महाप्रसाद व चहापाणी आणि मुक्कामाची सोय करून सेवा करत असून त्याबद्दल त्यांनी येथील सर्वांचे धन्यवाद मानले. यावेळी सरपंच ओमेश जपे यांनी श्री सिद्धेश्वर पायी दिंडी सोहळा येथे आल्यानंतर मोठे धार्मिक वातावरण निर्मिती होते.कै. पुरुषोत्तम महाराज यांनी येथील अमरदिप संघटना व ग्रामस्थ आणि भाविकांना मोठे आशीर्वाद दिलेले आहे. व हे आशीर्वादच आज सर्वांच्या उपयोगी पडत आहे. असे सांगत त्यांनी सावळीविहीर बुद्रुक ग्रामपंचायत, सावळीविहीर सोसायटी व ग्रामस्थांच्या वतीने ह भ प नानाभाऊ पगार महाराजांचे व दिंडीचे स्वागत केले. यावेळी राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शांताराम जपे , मा. सरपंच अशोकराव आगलावे, राहाता पंचायत समितीचे मा.सभापती जिजाबा आगलावे, शिवाजी आगलावे, बाबासाहेब जपे, दिलीप कापसे ,संतोष पळसे, सोमनाथ आगलावे, पत्रकार राजकुमार गडकरी राजेंद्र दुनबळे, बाळासाहेब काशीद, राजू कापसे, भीमा वर्पे, संजय वाघमारे, सुनिल वाघमारे, राजाभाऊ काशीद, गणेश रेवगडे, शरद गडकरी, अशोक कुऱ्हे, भाऊसाहेब सातदिवे,पोलीस पाटील सुरेश वाघमारे, दिलीप आगलावे, कैलास जपे ,सतीश जपे, परसराम जपे, राजाभाऊ पवार, गणेश कापसे, विक्रम आगलावे, राधू पवार, गोकुळ जपे, बाबा गायकवाड, काभूनाना पाचोरे,आदमने, रवी बनकर,टोरपे आण्णा, किरण जपे, सिद्धार्थ रणधीर,नाना पवार,आदींसह पद्माताई कापसे, बेबीताई सोनवणे,जपे ताई, कामठे मावशी, दोडिया ताई, गायकवाड ताई, वाघ आजी, आदींसह महिला भजनी मंडळ, सावळीविहीर ग्रामपंचायतीचे व सोसायटीचे आजी माजी पदाधिकारी तसेच अमरदीपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रवचनानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. तसेच सावळीविहीर बुद्रुक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने दिंडीतील वारकऱ्यांसाठी प्राथमिक तपासणी व मोफत औषध गोळ्या वाटप स्टॉल येथे मांडण्यात आला होता. डॉक्टर व आरोग्य सेवक या वारकऱ्यांची आरोग्य सेवा करत होते. या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचा हभप नानाभाऊ पगार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.या सर्व कार्यक्रमांचा वारकरी व गावातील भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला.
  ‌

Post a Comment

0 Comments