लोहगाव (वार्ताहर): रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालयात अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याचे आयोजन केल्याची माहिती स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रावसाहेब म्हस्के आणि प्राचार्य विनायक मेथवडे यांनी दिली.
महात्मा गांधी विद्यालयाचे शैक्षणिक वर्ष २०२४-२५ हे अमृत महोत्सवी वर्ष असल्याने या निमित्ताने रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री आणि या विद्यालयाचे माजी विद्यार्थी खासदार पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली माजी विद्यार्थी स्नेहमेळावा आयोजित केला आहे. विद्यार्थी वसतिगृह इमारत आणि कनिष्ठ महाविद्यालय इमारत उद्घाटन, कर्मवीर भाऊराव पाटील अभिवादन स्थळ नूतनीकरण, एसएससी बॅच 1983 कडून मिळालेल्या सायकल स्टॅन्डचे उद्घाटन तसेच पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार बहुउद्देशीय सभागृहाचे भूमिपूजन आदरणीय पवार साहेब यांच्या हस्ते होणार आहे. या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नामदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, डॉ. सुधीर तांबे, आमदार रोहितदादा पवार, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, खासदार निलेश लंके, चेअरमन चंद्रकांत दळवी, व्हाईस चेअरमन भगीरथ शिंदे, कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के, सचिव विकास देशमुख, मीनाताई जगधने, अरुण कडू, एकनाथराव घोगरे, दादाभाऊ कळमकर, विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे, आमदार आशुतोष काळे, ॲड.संदीप वर्पे, जनरल बॉडी सदस्य किरण कडू यांच्यासह जिल्ह्यातील आमदार, माजी विद्यार्थी, रयत सेवक आदीजण मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
0 Comments