भाजप महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी वंदना पाटील



दिलीप शिंदे
सोयगाव दि.१३- छत्रपती संभाजीनगर भाजप महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष पदी सायगाव तालुक्यातील जरंडी येथील वंदना राजेंद्र पाटील यांची निवड झाल्याची घोषणा जिल्हाध्यक्ष ऐश्वर्या गाडेकर यांनी दि.१३ सोमवारी नियुक्ती पत्र देऊन केली आहे. 

दरम्यान वंदना पाटील यांनी पक्ष संघटन मजबूत करून पक्षाचे ध्येय धोरणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात पोहचावे असे या नियुक्ती पत्रात नमूद केले आहे. या निवडी बद्दल जिल्हा परिषद सदस्या पुष्पा काळे,सभापती उत्तम चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य माहीन मुलतानी, पंचायत समिती सदस्य राहुल राठोड, जिल्हा चिटणीस सुनील गव्हांडे, सामाजिक कार्यकर्त्या तेजस्विनी काळे,स्वाती पाटील,दिलीप पाटील,कृषिभूषण रविंद्र पाटील आदींनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments