शिर्डी निमगाव येथील श्री साईबाबा वारकरी शिक्षण संस्था व ज्ञानेश्वर महाराज मंदिर, परमहंस आश्रम येथे भव्य अखंड हरिनाम सप्ताह व भागवत कथा तसेच श्री साई चरित्र पारायण सोहळा मंगळवार 14 एप्रिल ते मंगळवार 21 एप्रिल 2020 या कालावधीत होणार असून त्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री श्री 1008 श्री महामंडलेश्वर परमहंस स्वामी काशिकानंद महाराज सरस्वती यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या सप्ताहात दररोज पहाटे चार ते पाच काकडा भजन, सकाळी सहा ते सात श्री विष्णू सहस्त्रनाम, सकाळी सात ते अकरा श्री साई सतचरित्र पारायण, दुपारी चार ते पाच संत कथा व प्रवचन, सायंकाळी सहा ते सात हरिपाठ व सायंकाळी सात ते नऊ हरिकीर्तन व रात्री नऊ वाजता संगत पंगत ,महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. दररोज दुपारी दोन ते पाच या वेळेत हभप लहू महाराज कराळे यांची भागवत कथा होणार आहे.
तर या कालावधीत हभप भाऊसाहेब महाराज डांगे ,हभप दौलत महाराज डुंबरे, हभप सुधाकर महाराज मुंगसे ,ह भ प ओंकार महाराज बोचरे ,ह भ प अमोल महाराज शेलार ,ह भ प अशोक महाराज आहेर ,ह भ प दादासाहेब महाराज गायकवाड, ह भ प सूर्यवंशी महाराज यांचे प्रवचन होणार आहे तर ह भ प गणेश महाराज डुंबरे, हभप हर्षद महाराज, ह भ प राहुल महाराज डुंबरे ,ह भ प शिवाजी महाराज गायके ,धर्मवीर ह भ प रमेश महाराज शिरसागर ,ह भ प रामनाथ महाराज शास्त्री, ह भ प विश्राम महाराज ढमाले यांचे या कालावधीत कीर्तन होणार आहे. या कार्यक्रमांना महंत रामगिरीजी महाराज, मंहत रमेशगिरीजी महाराज, महंत रामानंदगिरीजी महाराज, मंहत उद्धव महाराज मंडलिक, महंत अरुणनाथगिरी महाराज, महंत राघवेश्वरानंद महाराज, तसेच डॉक्टर सुजय दादा विखे पा. खा. भाऊसाहेब वाकचौरे संस्थांनचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर आदी सदिच्छा भेटी देणार आहेत .तरी या सर्व कार्यक्रमाचा मोठ्या संख्येने भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन या आश्रमाच्या वतीने व महामंडलेश्वर काशिकानंद महाराज यांच्या वतीने एका पत्रकांन्वये करण्यात आले आहे.
0 Comments