मराठी नववर्षाच्या पूर्वसंध्येला झालेल्या सावळीविहीर बु. येथील जि.प. शाळेतील छोट्या विद्यार्थ्यांचा -जल्लोष चिमुकल्यांचा- या कार्यक्रमाने उपस्थितांना केले मंत्रमुग्ध!

शिर्डी ( प्रतिनिधी)-श्री गणेश भक्ती वंदना, राधा राधा, तसेच जय मल्हार व साईबाबांच्या त्याचप्रमाणे विविध लोकगीते व सीने गीतांच्या ठेक्यावर छोट्या छोट्या विद्यार्थ्यांनी केलेल्या सामूहिक नृत्याचा -जल्लोष कार्यक्रमाचा- हा सदाबहार कार्यक्रम उपस्थितांना मंत्रमुग्ध करून गेला. .
  राहाता तालुक्यातील सावळी विहीर बुद्रुक जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचा हा सांस्कृतिक कार्यक्रम गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला बुधवारी सायंकाळी शाळेच्या प्रांगणात भव्य व्यासपीठावर आणि आकर्षक विद्युत रोषणाई मध्ये संपन्न झाला. प्रथम दीप प्रज्वलन व श्री साईंच्या प्रतिमेचे पूजन राहता कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शांताराम जपे, माजी उपसरपंच गणेश कापसे, पोलीस पाटील सौ संगीता सुरेश वाघमारे,सागर जपे, निलेश सांगळे, मुख्याध्यापक नानासाहेब मेहेत्रे सर, पत्रकार राजकुमार गडकरी, शिवाजी आगलावे, सुधीर कामटे आदींच्या उपस्थितीत करण्यात आला. नंतर सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच ओमेश जपे यांनी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देत शाळेच्या प्रश्न, समस्यांसाठी ग्रामपंचायत नेहमी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. यानंतर श्री गणेश वंदना व गणेश भक्तीने कार्यक्रमाची विद्यार्थ्यांनी सामूहिक नृत्य करत सुरुवात केली. त्यानंतर राधे राधे, मी पाण्याला जाते ,पाणी घेऊन येते, लुंगी डांस लुंगी डांस, राधा नाचेगी, राम नवमीला ,पालख्या निघाल्या शिर्डीला, भगव्या कपनीवाला,आदींसह विविध गीतांवर नृत्य करत या चिमुकल्यांनी उपस्थितांची मने जिंकली. अनेकांनी यावेळी या चिमुकल्या विद्यार्थ्यांवर बक्षीसांचा वर्षाव केला. या कार्यक्रमात यमराज ग्रुपचे राजू कुदळे यांनीही पुढील वर्षी या शाळेच्या या सांस्कृतिक कार्यक्रमाचा यमराजग्रुप तर्फे खर्च करण्याचे घोषित केले. त्यांचाही शाळेतर्फे सत्कार करण्यात आला. या जल्लोष चिमुकल्यांचा कार्यक्रमात ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्यांना नृत्य दिग्दर्शक शुभम गायकवाड व प्रणाली पटेकर यांनी मोठे मार्गदर्शन केले. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक नानासाहेब मेहेत्रे सर, सिताराम गुरसळ ,अरुण संदानशिव, बाबासाहेब दिघे, तुकाराम डापसे व श्रीमती रणमाळे मॅडम आदी शिक्षकांनी मोठे परिश्रम घेतले. विशेष म्हणजे या शाळेतील इयत्ता पहिलीतील सर्वच्या सर्व 29 विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेऊन उपस्थितीतांचे मोठे मनोरंजन केले. या कार्यक्रमाला या शाळेतील माजी शिक्षक दत्ता गायकवाड यांच्यासह काही शिक्षकांचीही उपस्थिती होती.या कार्यक्रमासाठी विद्यार्थी ,माजी विद्यार्थी, पालक, शिक्षक गावातील ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रम संपल्यानंतर मुख्याध्यापक नानासाहेब मेहेत्रे सर यांनी सर्वांचे सहकार्याबद्दल आभार मानले.

Post a Comment

0 Comments