दिलीप शिंदे
सोयगाव दि.०४ - सोसीयल मीडिया वर जंगलातील संरक्षित वन्यजीव, स्टंट, संकट ग्रस्त वनस्पती, अभयारण्य, वणवे लागतील असे कृत्य करून ते फेसबुक,व्हाट्सअप,इंस्टाग्राम वर व्हूज, लाइक्स मिळवून पैसे कमावण्याच्या लालसेने पोस्ट, रिल्स अपलोड करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. यातून निसर्ग धोक्यात आला आहे.
गल्ला भरू व हौसे निसर्ग प्रेमी, जंगल सफारी, इको टुरिस्म, काजवा महोत्सव ई.नावाखाली सुरु झालेले हे असे प्रकार गंभीर असून यावर निर्बंध घालावे व आज चांदोली अभयारण्य मध्ये प्रणव महाजन नामक स्थानिक असणाऱ्या व जंगल भटकंतीचे ईव्ह्हेंट्स आयोजित करणाऱ्या व्यक्तीने येथील देवराई मधील आय यु सी एन च्या अती संकटग्रस्त, रेड डाटा मध्ये समाविष्ट, साईट्सच्या यादीतील,अत्यंत महत्वाचे म्हणजे जगात केवळ सह्याद्रीच्या पश्चिम घाटातच नैसर्गिक रित्या आढळतो ( प्रदेश निष्ठ आहे) अशा वृक्षाजवळ उभे राहुन तो त्या अभयारण्यात कुठे आहे ते चित्रण व वर्णन यात केले असून व्हिडीओ मध्ये चांदोली चे लोकेशन, नरक्या चा उल्लेख, बहु्गुनी उपयोग, स्वतःचा फोन नंबर, संस्थेचे नाव यांचा उल्लेख असणारा व्हिडीओ रील व्हायरल केला आहे. तस्करांना अप्रत्यक्ष " मार्ग " दाखविन्याचा हा प्रकार आहे व याची चोरी होण्याची शक्यता बळावते. त्यावर त्वरित कारवाई करावी व अशा बाबींवर निर्बंध आणून वन विभागाने कठोर नियम बनवावे, पुढेही जंगलाचे आक्षेपार्ह रिल्स वगैरे प्रसारित होऊ नये अशी तक्रार व निवेदन, पुरावा म्हणून व्हिडीओ सिल्लोड येथील वन्यजीव संवर्धक डॉ. संतोष पाटील यांनी वनमंत्री गणेश नाईक, राज्याचे प्रधान वन संरक्षक श्रीनिवास राव यांना इमेल द्वारे पाठविला आहे .
--- नरक्याच्या नरक यातना काय आहेत--- या झाडाच्या सालीत व खोडात कॅम्पोथेसिन नामक कॅन्सरवर उपयोगी तत्व असून त्यापासून केमो थेरपीचे औषधं बनवले जाते. याचे संशोधन व पेटंट फक्त जपान व जर्मनी कडे आहे मात्र वृक्ष फक्त महाराष्ट्राच्या सह्याद्रीत आहे.त्या साठी गत २० वर्षांपासून या झाडाची चोरटी तस्करी होते आहे. जंगलातील ८० टक्के नरक्या आता तस्करांनी नामशेष केला.मुख्यतः तस्कर हे स्थानिक असून या ८- ९ वर्षात सुमारे ३० लाख किलो व पाचशे कोटी रु.हुन अधिक किमतीची नरक्याच्या पावडरची विदेशात तस्करी झालेचा अभ्यासक, जबाबदार प्रसिद्धी माध्यमे यांचा अंदाज आहे. २००७ मध्ये याच चांदोली मध्येच ६०० गोणी नरक्या ची तस्करी पकडली गेली होती.
-- विषयाचे सर्वात गांभीर्य काय- - हा व्हायरल व्हिडीओ युनेस्कोचे वर्ल्ड हेरिटेज साईट हा दर्जा प्राप्त असलेल्या व जैवविविधता हॉट स्पॉट असलेल्या, संरक्षित अभ्यारण्य व सह्याद्री टायगर रिझर्व क्षेत्रात येणाऱ्या संवेदनशील भागातील आहे. येथील जैवविविधता धोक्यात आली तर त्याचा नकारात्मक परिणाम जागतीक वारस्यावर होईल.
डॉ. संतोष पाटील, सिल्लोड .
------नरक्या काय आहे-- -या झाडाचे शास्त्रीय नाव -नोथापोडाइट्स निमोनियाना असे असून यास जेव्हा फुले व फळं धारणा होते तेव्हा त्याचा नाकाला घाणेरडा,असह्य दुर्गंध येतो म्हणून यास नरक्या म्हटलं जाते.
0 Comments