या बाबत प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की,भारत सरकार मान्यता प्राप्त ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे कार्य विविध राज्यात सुरु असून "जागो ग्राहक जागो" ही चळवळ तळागाळा पर्यत पोहचली पाहिजे. हा समितीचा उद्देश आहे. सरकारी निमसरकारी व खाजगी आस्थापना मध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती निर्माण करण्यात ही संस्था अग्रेसर आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात सर्व तालुक्यात या समितीच्या नेमणूका केल्या जाणार आहेत. तरी या कार्यात सहभागी होवू इच्छिणारांनी संपर्क साधावा असे आवाहन पगारेसर यांनी केले.
राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक पुरुषोत्तम पगारे सर हे गेल्या ४० वर्षापासून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून विविध सामाजिक व शैक्षणिक संस्थांच्या पदावर कार्यरत आहे. शासनाची मान्यता घेवून गेली ३३ वर्षा पासून रात्रशाळा चालविणे, हिंदी या राष्ट्रभाषेचा महाराष्ट्र भर प्रचार प्रसार करतांना जिल्हा पातळीवर तज्ञ मार्गदर्शक म्हणून प्रशिक्षण देणे, हिंदीच्या परीक्षांना विद्यार्थी बसविणे या शिवाय वाचन संस्कृती वाढविण्यासाठी शासनाची मान्यता घेवून सार्वजनिक वाचनालय चालविणे, यासारखी अनेक कार्य त्यांच्या वतीने सुरू आहेत. सावळीविहीर येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्येही त्यांनी अनेक वर्ष सेवा केली.अशा राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरुषोत्तम पगारे सर यांची या भारत सरकार नोंदणीकृत माणुसकी सोशल फाउंडेशन नाशिक संचलित ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या मार्गदर्शक पदी निवड झाली आहे.या निवडी बदल त्यांचे अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे. प्रत्यक्ष भेटून ,सोशल मीडियावर व तसेच भ्रमणध्वनी द्वारे त्यांचे अभिनंदन सर्व क्षेत्रातून होत आहे.
0 Comments