समर्पण ग्रामोन्नती बहुदेशीय संस्थेचे कार्य उल्लेखनीय -- डॉ.मायकल मार्टिन



अकोले -- सामाजिक बांधिलकी ठेऊन शिक्षण,आरोग्य क्षेत्रामध्ये सामाजिक जागृती करून प्रसार,प्रचार करत असलेल्या समर्पण ग्रामोन्नती संस्थेचे कार्य उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन प्रशिक्षक डॉ. मायकल मार्टिन यांनी केले.भंडारदरा पांजरे बेट शिखर कॅम्पिंग येथे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसाठी एक दिवसीय कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
  डॉ.मार्टिन यांनी म्हटले की, संस्था उभी करणं खूप सोपे असते परंतु ती टिकवणे ही कठीण असते संस्थेचे ध्येय गाठण्यासाठी विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून समाजामध्ये जागृती केल्यास सामाजिक बदल घडविण्यास मदत होईल.संस्थेच्या भविष्यातील वाटचाली संदर्भात संस्थेचे अध्यक्ष भास्कर येलमामे यांनी मार्गदर्शन करून भंडारदरा परिसरातील इतिहासाबद्दल पूरक माहिती दिली तर वन अधिकारी शंकर लांडे यांनी नैसर्गिक साधन संपत्ती, व वन्यविषयसंदर्भात माहिती देऊन सायंकाळचे सूर्यास्त दर्शन घडविले.
  या कार्यशाळेत, संस्थेच्या उपाध्यक्षा शैलजा साबळे,सचिव अनिल भोसले,खजिनदार बाबासाहेब कदम,उपसचिव सुनील सोनार,अविनाश काळे,संजय साळवे, स्नेहल जाधव,रमेश हिले,विकास निर्मल,पंकज तकते, गिरीधर बोडके,यशवंत घीरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.शेवटी अनिल भोसले यांनी सर्वांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments