येडाईच्या पालखीचा उद्या पिंपरी वळण मध्ये मुक्काम - सौ. तारा अहिरे प्रमुख आदिवासी नेत्यांची उपस्थिती

राहुरी ( प्रतिनिधी)

श्री क्षेत्र पिंपळदरी येथून निघालेल्या येडूमातेच्या‌ पालखीचा सोमवार २३ मार्च रोजी राहुरी तालुक्यातील पिंपरी वळण येथे मुक्काम असून पालखीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन सौ. तारा अहिरे यांनी केले आहे. 

           सौ.अहिरे म्हणाल्या की, श्री क्षेत्र पिंपळदरी येथून निघालेली येडूमातेची‌ पालखी संपूर्ण महाराष्ट्रात फिरत आहे. प्रत्येक गावामध्ये या पालखीचे जोरदार स्वागत होत आहे. तसेच या पालखीला भिल्ल समाजाकडून भरभरून मदत होत आहे. प्रत्येक गावात भिल्ल समाज पालखीची मिरवणूक काढून आनंद साजरा करत आहे. तसेच पालखीची मनोभावे पूजा करत आहे.राज्यभर फिरून ही पालखी सोमवार २३मार्च रोजी राहुरी तालुक्यातील पिंपरी वळण या गावी मुक्कामासाठी येणार आहे. सायंकाळी ५ वाजता या पालखीची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात येईल ,त्यानंतर ७ वाजता महाप्रसादाचे आयोजन केले आहे. व रात्री ठीक ८ वाजेपासून पालखी समोर देवीच्या गाण्यांचा भव्य असा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी नामांकित गायकांची उपस्थिती राहणार आहे त्यामध्ये प्रसिद्ध गायक सागर भाऊ गायकवाड, प्रसिद्ध गायिका सविता दादेगावकर , सूर्यकांत गायकवाड, शिवाजी पवार, लक्ष्मी पवार, यांचा गायनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. तसेच या कार्यक्रमासाठी आदिवासी भिल्ल समाजाचे प्रमुख नेते शिवाजीराव गांगुर्डे, कैलासदादा माळी, दिलीपराव बर्डे,संपतराव मोरे,संजय बर्डे, युवराज बर्डे,बाळासाहेब गांगुर्डे, साईनाथ बर्डे,राधाकृष्ण बर्डे,भास्करराव बर्डे, सुभाष पवार, संदीप बर्डे पाटील, अनिल बर्डे, नवनाथ माळी, नवनाथ शिंदे, रंगनाथ आहेर,नारायण माळी, दत्तात्रय माळी, खंडू गांगुर्डे, विजय पवार, कैलास बर्डे, सुनील बर्डे, राजेंद्र पिंपळे, सनी अहिरे, बाबुराव गांगुर्डे, संजय गांगुर्डे, भाऊराव अहिरे, चंद्रकांत धिरोडे, शिवाजी जाधव, राजेंद्र निकम, विलास बर्डे, मधुकर निकम,सुदामराव मोरे, आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत तरी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सौ. तारा अहिरे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments