दिलीप शिंदे
सोयगाव दि.०६-सोयगाव तालुक्यात तीन गट आणि सहा गणांसाठी दि.०७ शनिवारी ११३ मतदान केंद्रावर मतदान होत आहे त्यासाठी दि.०६ शुक्रवारी दुपारी सर्व मतदान केंद्रावर ११३ पोलिस अधिकारी व ४५२ निवडणूक कर्मचारी पोहचले आहे. दरम्यान ११३ पोलीस अधिकारी व ३१ होमगार्ड असा कडेकोट बंदोबस्त तालुक्यातील११३ मतदान केंद्रावर राहणार आहे.
तीन गटांसाठी ११ तर सहा गणांसाठी २६ अश्या एकूण ३७ उमेदवारांचे भवितव्य शनिवारी मतपेटीत बंद होणार आहे त्यासाठी तालुका प्रशासन सज्ज झाले असून या मतदान केंद्रावर पोलिसांचा मोठा फौजफाटा शुक्रवारी सायंकाळी तैनात झाला आहे.
कोट--१)प्रत्येक मत मौल्यवान आहे. मतदारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता निर्भयपणे मतदान करावे. बॅलेट युनिटबाबत काही शंका असल्यास केंद्रावरील मतदान कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी, जेणेकरून तुमचे मत अचूक नोंदवले जाईल.
...रुपेश सिनगारे, निवडणूक निर्णय अधिकारी
0 Comments