प्रवरा मेडीकल ट्र्स्ट तर्फे महाशिवरात्री निमित्त शिबिर


राजुरी (वार्ताहर)
प्रवरा मेडिकल ट्रस्टचे डॉ. विठ्ठलराव विखे पाटील प्रवरा ग्रामीण रुग्णालय, डॉ. बाळासाहेब विखे पाटील ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तसेच महाशिवरात्र निमित्ताने चनेगाव ग्रामपंचायत यांचे संयुक्त विद्यमाने मोफत सर्व रोग निदान व उपचार शिबिर रविवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ ते दुपारी एक वाजता  रामेश्वर विद्यालय चनेगाव येथे आयोजित करण्यात आले आहे.
शिबिरामध्ये हृदयविकार मेंदूकार मधुमेह, दमा, छातीचे विकार, नेत्रचिकित्सा, मोतीबिंदू, काचबिंदू, तिरळेपणा, लासुर, रांजणवाडी इत्यादी. हाडांचे आजार, हाड मोडणे, संधिवात सांधे तसणी, गर्भपिशवीचे आजार,पाळीचा त्रास, गर्भाशयाचे आजार, बालकांचे सर्व आजार व लसीकरण,मूत्र रोग,पित्ताशयातील खडे,पोटाचे आजार निदान व ऑपरेशन,दंत  चिकित्सा,दात साफ करणे,दात किडणे,दात दुखी याबाबतीत तज्ञ डॉक्टर यांच्याकडून मोफत तपासणी सल्ला व उपचार या ठिकाणी देण्यात येणार आहेत.
वेळी आयुष्यमान भारत कार्ड काढून मिळणार आहे.या शिबिरात भाग घेणाऱ्या रुग्णांना गरज पडल्यास पुढील उपचार किंवा ऑपरेशन डॉ.विठ्ठलराव विखे पाटील प्रवरा ग्रामीण रुग्णालय लोणी येथे करण्यात येईल तरी गरजूंनी या सुवर्णसंधीचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतिने करण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments