टाकळीभान प्रतिनिधी
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री.जगदंबा प्रासादिक विद्यालयात भोकर येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साह पूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
सकाळी साडेआठ वाजता शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व आरती करण्यात आली.
त्याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन कार्य व विचार आजही आपल्याला प्रेरणा देतात असे प्रतिपादन विद्यालयाचे पर्यवेक्षक .राजेंद्र आदमाने यांनी केले.तसेच विद्यालयाची सवाद्य मिरवणूक लेझीम पथक, झांज पथक, शिव जन्माचा पाळणा, बालशिवाजी व जिजाऊंच्या वेशभूषेतील शालेय विद्यार्थी जय जिजाऊ,जय शिवरायांच्या जयघोषाने परिसर दणाणून सोडला.
भवानी चौकात लेझीम व झांज यांचे प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.विद्यार्थ्यांची मनोगते झाली.लेझीम व झांज कार्यक्रमासाठी. भिवा साबळे, राहुल डावरे ,. सचिन शिंदे, प्रदीप पटारे,श्री. प्रवीण लोखंडे , अविनाश महाजन. नितीन भुसारी. अशोक रहींज . गणेश देवतरसे,. विजय खेसे, नितीन कोहक . संजय सकट भाऊसाहेब शेळके मामा,श्रीमती कल्पना म्हस्के, शीला शिंदे, गीता मोरे, पूजा सरोदे,संगीता सोनवणे, पटारे मॅडम यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.विद्यालयाचे मुख्याध्यापक .केशव जाधव यांचे कार्यक्रमासाठी मार्गदर्शन लाभले.सदर कार्यक्रमासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रावसाहेब लोखंडे पा.ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच,सोसायटीचे चेअरमन,व्हाईस चेअरमन व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.रेणुका साउंड चे मालक सतीश वाकडे तसेच जतीन चौधरी यांनी ड्रोनच्या साह्याने शूटिंग केले. कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने पर्यवेक्षक श्री.राजेंद्र आदमाने यांनी आभार मानले.
0 Comments