शिर्डी (प्रतिनिधी )-राहता तालुक्यातील सावळीविहीर बु येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल या विद्यालयातील सन 2025-26 या शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ गुरुवारी दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्कूल कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब जनार्दन जपे हे होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून उद्योजक विजयराव कडू (श्रीराम इंडस्ट्रीज, सावळीविहीर), कोपरगाव महाविद्यालयाचे प्रा.शहा सर, उपसरपंच विकास जपे , (उपसरपंच), भारत नेतकर मा. उपसरपंच गणेश कापसे, तसेच सौ. पद्माताई कापसे उपस्थित होत्या.कार्यक्रमाच्या सुरुवातीला इयत्ता दहावीचे वर्गशिक्षक श्री.म्हस्के सर यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी विद्यार्थ्यांना आगामी दहावीच्या परीक्षेसाठी शुभेच्छा देत परिश्रम, सातत्य आणि आत्मविश्वास यांचे महत्त्व अधोरेखित केले. कोपरगाव महाविद्यालयाचे श्री.शहा सर, विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री.खेडकर सर तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिक सौ. डहाळे मॅडम यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले.
प्रमुख पाहुणे विजयराव कडू पा. यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना जीवनातील ध्येय निश्चित करून त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचा सल्ला दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.बाळासाहेब जपे पा.यांनी विद्यार्थ्यांना भविष्याचा योग्य मार्ग निवडण्याबाबत अनमोल मार्गदर्शन केले व उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी काही विद्यार्थिनींनीही आपले मनोगत व्यक्त करत शाळेतील आठवणींना उजाळा दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींनी प्रभावीपणे केले. आभार प्रदर्शन विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती.कानडे मॅडम यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. डहाळे मॅडम, ज्येष्ठ शिक्षक श्री.म्हस्के सर, श्री.काळेगोरे सर, श्री.खान सर, श्री.खेडकर सर, श्रीमती.कानडे मॅडम, श्री.धीवर सर, श्री.वाकचौरे सर, विद्यालयाचे ज्येष्ठ लेखनिक श्री.लोखंडे सर तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
0 Comments