डॉ. विखे पाटील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दोघांवर मूत्रपिंड प्रत्यारोपण यशस्वी : दोघांना मिळाले नवजीवन



राजुरी (प्रतिनिधी) लोणी ता. राहाता येथील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील प्रवरा ग्रामीण रुग्णालय पुन्हा एकदा ग्रामीण भागासाठी संजीवनी ठरले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने सुरू झालेल्या अवयव प्रत्यारोपण केंद्रात, एका आईने आपल्या २७ वर्षांच्या मुलाला आणि एका पत्निने आपल्या पतीला मूत्रपिंड दान करून दोघांनाही मृत्यूच्या दारातून परत आणले.

 आतिशय गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली असून या दोनही रूग्णांना जिवनदान मिळाले आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील एका २७ वर्षीय तरुणाला गेल्या पाच वर्षापासून डायलेसिस करावे लगात होते. उपचारासाठी तो लोणी येथील प्रवरा मेडीकल ट्रस्टच्या डॉक्टरांकडे पोहोचला आणि त्याला आशेचा किरण दिसला. तपासणी अंती डॉक्टरांनी त्याला मूत्रपिंड प्रत्यारोपण हा एकमेव पर्याय असल्याचे सांगितले. यामुळे त्याच्या आईने आपले मूत्रपिंड दान करण्याचा निर्णय घेतला. तसेच बुलढाना जिल्ह्यातील ४७ वर्षे वयाच्या रूग्णास देखील त्याच्या पत्नीने मुत्रपींड दान करण्याचा निर्णय केला. अखेर या दोन्ही शस्त्रक्रिया यशस्वी पार पडल्या. नियतीने मरणाच्या दारात उभे केले होते परंतू एका आईच्या व एका पत्नीच्या निस्वार्थ प्रेमामुळे या दोघांना नवजीवन मिळाले. यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील, कुलगुरू डॉ. व्ही.एन.मगरे, विश्वस्त सुवर्णा विखे पाटील, विश्वस्त मोनिका सावंत, विश्वस्त ध्रुव विखे पाटील यांनी सर्व डॉक्टरांच्या चमुचे अभिनंदन केले.
महाराष्ट्र शासनाने लोणी येथील डॉ. विठ्ठ्लराव विखे पाटील ग्रामीण रुग्णालयाला अवयव प्रत्यारोपण, हृदय प्रत्यारोपण आणि नेत्र अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियांसाठी मान्यता दिली आहे. त्यामुळे हे रुग्णालय ग्रामीण भागातील रुग्णांसाठी वरदान ठरले आहे. रुग्णालयात अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर आणि अनुभवी डॉक्टरांची टीम तयार आहे. यापुर्वी देखील एका २३ वर्षे वयाच्या तरूणावर यशस्वीरीत्या मुत्रपींड प्रत्यारोपण केले आहे. 
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील तसेच लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी ग्रामीण भागात जागतिक दर्जाची आरोग्य सेवा पोहोचावी असे स्वप्न पाहिले. आज, डॉ. राजेंद्र विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्याच स्वप्नांची परिपूर्णता झाली, आहे. यामुळे केवळ अहिल्यानगरच नव्हे, तर मराठवाड्यासह राज्यातील जवळपास सहा ते सात जिल्ह्यांतील गरजू रुग्णांना येथे जीवनदान मिळत आहे.
या महत्त्वपूर्ण शस्त्रक्रियेमध्ये रुग्णालय प्रशासनाचे अधिष्ठाता डॉ. सतिश महाजन, रूग्णालय प्रशासक संचालक डॉ. योगींद्र सिंग, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश जगदाळे, डॉ. एन. एस.पवार, डॉ. सुशिलकुमार झा, डॉ. अक्षय शेट्टी आणि डॉ. एस. एल. तुंगीकर यांचा सहभाग होता. अवयव प्रत्यारोपण तज्ञ डॉ. विपिन विभूते यांच्या नेतृत्वाखाली भूलतज्ञ डॉ. मनीष पाठक, डॉ. राहुल तांबे, डॉ. ऋषिकेश वाघोलीकर, डॉ. मयुर गंगवाल, डॉ. रोहन रघुवंशी, डॉ. काजल दरंदले, डॉ. तुषार भवर, डॉ. संजय चौधरी, डॉ. अमोल भालेराव, डॉ. सुरजकुमार बांगर, डॉ. भाग्यश्री पुराणीक यांनी ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी केली. अवयव प्रत्यारोपण समन्वयक ज्ञानेश्वर गाडेकर यांनी रूग्णाचे नातेवाईक, प्रशासन, संपूर्ण डॉक्टर्सच्या टीमच्या परिश्रमामुळे हे शक्य झाले.

Post a Comment

0 Comments