डिजिटल क्रांतीमुळे पत्रकारितेचा चेहरा मोहरा बदलला;श्रीरामपूर येथील पत्रकार कार्यशाळेत मंथन



टाकळीभान प्रतिनिधी-
डिजिटल क्रांतीमुळे कोणत्याही औपचारिक पदवीशिवाय सामान्य माणूसही बातमीदारी करू शकत आहे. मात्र याकडे आव्हान म्हणून न पाहता त्यात संधी शोधून पत्रकारांनी ग्रामीण भागातील प्रश्नांना वाचा फोडावी,असे आवाहन श्रीरामपूर येथे आयोजित पत्रकार कार्यशाळेत जेष्ठ पत्रकार मंडळींकडून करण्यात आले.
     बेलापूर रस्त्यावरील अनमोल रसवंती येथे शनिवारी आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. 
यावेळी दैनिक लोकमतचे संपादक सुधीर लंके, दैनिक सार्वमतचे संपादक अनंत पाटील, पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक गाडेकर, राज्य अधिस्वीकृती समिती सदस्य प्रकाश कुलथे, करण नवले, अनिल पांडे, महेश माळवे, राजेंद्र बोरसे, नागेशभाई सावंत,बाळासाहेब भांड,नितीन शेळके,मिलिंदकुमार साळवे, विकास अंत्रे, रवी भागवत, भास्करराव खंडागळे, मारुती राशीनकर, सुनील मुथा, मधुकर माळवे, आदी उपस्थित होते.
कार्यशाळेत सुधीर लंके यांनी कोविडनंतर ग्रामीण पत्रकारितेसमोरील आव्हाने व अनंत पाटील यांनी डिजिटल साधनांचा वापर संधी व आव्हाने या विषयावर मनोगत व्यक्त केले. 
कोविड नंतरच्या काळात अगदी गाव खेड्यामध्ये डिजिटल पत्रकारितेचे युग सुरू झाल्याचे पाहायला मिळते. अनेक जण आपापल्या गाव परिसरातील प्रश्नांचे वृत्तांकन डिजिटल साधनांद्वारे करत आहेत. वृत्तपत्रातील प्रतिनिधींनी सुद्धा हे तंत्रज्ञान आत्मसात करणे ही काळाची गरज आहे. ज्यांच्या रक्तामध्ये पत्रकारिता भिनलेली आहे, त्यांना मात्र डिजिटल युगातही संधी राहील. केवळ पदवी मिळवली म्हणजे कोणीही पत्रकार ठरत नाही. तर बातमीदारीसाठी ज्याच्याकडे विषय आहेत तो पत्रकार. डिजिटल क्रांतीचे युग येत्या काळात अधिक गतिमान होईल, असे मत लंके व पाटील यांनी व्यक्त केले. श्रीरामपूर पत्रकार संघाचे वतीने पत्रकारांसाठी कार्यशाळा आयोजित करणे ही उल्लेखनीय बाब आहे असा गौरवही त्यांनी केला.
यावेळी पत्रकार महेश रक्ताटे,सलीमखान पठाण, सुनील कुलकर्णी, गौरव साळुंखे दिलीप लोखंडे , चंद्रकांत लांडगे, चंद्रकांत झुरंगे,हरिभाऊ बिडवे,बापूसाहेब नवले ,अशोक रणवरे, अर्जुन राऊत, अशोक पटारे, विशाल वर्धावे, राजेंद्र गागरे ,प्रदीप आहेर, साईनाथ बनकर,प्रा. बाळासाहेब शेळके उपस्थित होते. रयत शिक्षण संस्थेच्या बोरावके महाविद्यालयाचे वृत्तपत्र विद्या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments