मराठी समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शिर्डीत घेतले साईदर्शन!

शिर्डी (प्रतिनिधी)- मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी नववर्ष दिनी शिर्डीत येऊन श्री साईबाबांचे दर्शन घेतले .राज्यातील शेतकरी मोठ्या अडचणीत असून, ते या संकटातून बाहेर पडावेत आणि राज्यातील जनता सुखी-समाधानी राहो, अशी प्रार्थना त्यांनी शिर्डी साईबाबांच्या चरणी केली.
 
नवीन वर्षाच्या निमित्ताने शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी आलो असल्याचं सांगत नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा आहेत. असं त्यांनी म्हटलं. 
शिर्डीत श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा साई संस्थांनचे मंदिर प्रमुख विष्णू थोरात यांनी श्री साई मूर्ती व शाल देऊन सत्कार केला. माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट केली. सध्या पुन्हा आंदोलन करण्याची गरज वाटत नसल्याचं त्यांनी सांगितलं. आरक्षणाची जबाबदारी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर असून समाजाने त्यांच्यावर विश्वास ठेवला असल्याचं ते म्हणाले. मुख्यमंत्री यांनी मराठवाड्याचा जीआर निघाल्याचं सांगितल्याने योग्य पद्धतीने काम होईल असा विश्वास असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

 मात्र, पुन्हा आंदोलनाची वेळ आली तर सरकारची गय केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी सर्व उपस्थितांना त्यांनी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments