टाकळीभान प्रतिनिधी- शेतकर् यांना चांगले दिवस येण्यासाठी व्यवस्था बदलावी लागेल. येत्या 2027 मध्ये अशोक सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकित शेतकरी संघटना सत्तेत येणारच आहे. सध्याची व्यवस्था बदलण्यासाठी आगामी जिल्हा परीषद व पंचायत समितीच्या निवडणुकित शेतकरी संघटना उमेदवार उभे करणार असल्याचे सुतोवाच शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अड अजित काळे यांनी आयोजित पत्रकार सन्मान सोहळ्यात बोलताना केले. यावेळी श्रीरामपुर शहर व ग्रामिणचे पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पञकार दिन सप्ताह व नववर्षाचे औचित्य साधुन अड. काळे यांनी श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील त्यांच्या सत्यजित फार्म' येथे श्रीरामपुर तालुक्यातील सर्व पत्रकारांसाठी पत्रकार दिन सप्ताहाचे व नववर्षाचे ऑचीत्य साधत आयोजीत सन्मान सोहळा व स्नेह भोजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना अड. काळे म्हणाले कि, सध्याची सरकारी व्यवस्था ही शेतकर् यांसाठी कुचकामी ठरत आहे. शेतकर् यांचे अनेक प्रश्न आहेत. शेतकर् यांच्या प्रश्नासाठी लढणारी शेतकरी संघटना ही एकमेव संघटना शेतकर् यांसाठी संघर्ष करत आहे. या संघर्षाला पत्रकारांच्या लेखणीतुन मोठे बळ मिळत आहे. अनेक तरुण आता शेतकरी संघटनेत सामील होत आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस चिञ बदलताना दिसत आहे. शेतकर् यांची कामधेनु असलेला अशोक सहकारी साखर कारखाना ऊसाचा योग्य मोबदला शेतकर् यांना देत नसल्या ने सभासद शेतकर् यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी शेतकरी संघटनेने चळवळ उभी केली आहे.
त्या चळवळीला चांगला प्रतिसाद मिळत आसल्याने व शेतकर् यांना योग्य घामाचे दाम मिळण्यासाठी आगामी अशोकच्या निवडणुकित सभासद अशोकची सत्ता शेतकरी संघटनेच्याच हाती देणार आहेत. व्यवस्था बदलायची असेल तर सत्तेबाहेर राहून बदल होत नसल्याने येणार् या जिल्हा परीषद व पंचायत समीती निवडणुकितही शेतकरी संघटना उमेदवार उभे करणार आहे. यासाठी पत्रकारांचे मोठे योगदान असणार आहे. पञकारांमध्ये व्यवस्था बदलण्याची ताकद असल्याने यापुढील बदलासाठी पत्रकारांनी साथ द्यावी असे विनंती वजा आवाहनही यावेळी अड. अलीत काळे यांनी यावेळी केले. या कार्यक्रम प्रसंगी नेवासा नगरपंचायतचे नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ करण घुले यांचा शेतकरी संघटना व पत्रकारांच्या वतीने सत्कार करण्यात आला,
यावेळी पत्रकारांच्या वतीने विष्णुपंत वाघ, शिवाजी पवार, चंद्रकांत झुरंगे, अनिल पांडे, चंद्रकांत लांडगे, मार्गदर्शन केले तर शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, तालुकाध्यक्ष युवराज जगताप, प्रा. कार्लस साठे, हरी आप्पा तुवर, साहेबराव चोरमल, रुपेंद्र काले यांनी शेतकरी संघटनेच्या सुरु असलेल्या लढ्याची माहीती दिली.
याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार रमेश कोठारी, पद्माकर शिंपी, करण नवले, विष्णुपंत डावरे, देवीदास देसाई बाळासाहेब आगे, महेश माळवे, रवी भागवत, नितीन शेळके, राजेंद्र बोरसे, प्रा. सलीम पठाण, शफिक बागवान, महेश रक्ताटे, सुरेश कांगुणे, सचिन उघडे, जयेश सावंत, संदिप आसने, रविंद्र आसने, दिलीप लोखंडे बापूसाहेब नवले, विजय देवळालकर, अशोक रणवरे, अर्जुन राऊत, हरिभाऊ बिडवे, गणेश कोकणे, राम आरगडे, मयुर लोखंडे, रविंद्र पवार, काकासाहेब पडवळ, राजेंद्र देसाई अशोक अभंग, संदीप जगताप अदि पत्रकारांसह शेतकरी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक भाऊसाहेब काळेयांनी केले तर सुत्रसंचलन संतोष मते तर आभार प्रदिप आहेर यांनी मानले.
चौकट.. 1
साखर कारखानदारी व्यवस्थेस शेतकर् याबद्दल अनास्था-विष्णू वाघ
याप्रसंगी आपल्या मनोगतात पत्रकार विष्णू वाघ म्हणाले की मी स्वतःच्या शेतात पाच एकर ऊस पिकास मुठभर देखील रासायनिक खतांचा वापर न करता गांडुळ खतांचा वापर करून उत्कृष्टपीक आणले, ऊस उचलणार् या कारखान्याचे सबंधित व्यवस्थेस लेखी कळवले की माझ्या ऊसाची ऊसतोड पेटवून करू नये. तरीही अखेर ऊस तोडणी मजुरांनी ऊस पेटवून ऊस तोड केली. एकीकडे पंचगंगा साखर कारखाना कुठेही ऊस वजन करून आणण्याचे शेतकर् यांना आवाहन करत आहे. तर दुसरीकडे ऊस वजन काट्याबद्दल अन्य कारखाने ब्र शब्द उच्चारत नाही. या साखर कारखानदारी व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवून शेतकरी संघटननेने अधिक आक्रमक होण्याचे आवाहन शेवटी वाघ यांनी केले.
चौकट 2
ग्रामीण भागातील शेतकर् यांचेप्रश्न सोडविण्यासाठी फक्त शेतकरी संघटननेची ओपीडी कार्यरत शिवाजी पवार यावेळी आपल्या मनोगतात पत्रकार शिवाजी पवार म्हणाले की ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकर् यांचे तालुका स्तरावर तहसील, महसूल, पोलीस ठाणे, पाटबंधारे, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात किरकोळ कामे अडकून पडलेली असतात. या प्रश्नांची सोडवणूक
करण्यासाठी अलीकडे पुर्णवेळ द्यायला राजकीय पुढार् यांची अनास्था निर्माण झाली आहे. कारण जो तो आपापल्या डोक्यावर असलेल्या ओझ्याचे प्रश्नातच गुंतलेला असल्याने त्यास फुरसत नाही. श्रीरामपूर तालुक्यातील सर्वसामान्य शेतकर् यांचे प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी अड. अजित काळे यांचे नेतृत्वाखालील शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष जिल्हाध्यक्ष व अन्य सहकारी पुर्णवेळ ओपीडी चालवत असल्याचे शेवटी पवार म्हणाले.
भोकर येथे शेतकरी संघटनेच्यावतीने आयोजीत श्रीरामपूर तालुक्यातील पत्रकारांसाठी पत्रकारदिन सप्ताह, नववर्षाभिनंदन व स्नेह भोजन सोहळ्या प्रसंगी उपस्थीतांना मार्गदर्शन करताना शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अड अजीत काळे समवेत विष्णुपंत वाघ, शिवाजी पवार, चंद्रकांत झुरंगे, अनिल पांडे, चंद्रकांत लांडगे, मार्गदर्शन केले तर शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, तालुकाध्यक्ष युवराज जगताप, प्रा. कार्लस साठे, हरी आप्पा तुवर, साहेबराव चोरमल, रुपेंद्र काले, रमेश कोठारी, पद्माकर शिंपी, करण नवले, विष्णुपंत डावरे, देवीदास देसाई, बाळासाहेब आगे, महेश माळवे, रवी भागवत, नितीन शेळके, राजेंद्र बोरसे, प्रा. सलीम पठाण, शफिक बागवान, महेश रक्ताटे आदिंसह मान्यवर दिसत आहेत.
0 Comments