श्री साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीच्या वतीने नवनिर्वाचित नगराध्यक्षा व या सोसायटीचे सभासद असणारे विष्णू थोरात यांच्या सुविद्य पत्नी सौ जयश्रीताई थोरात यांचा नुकताच शिर्डी नगराध्यक्षा म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करत अभिनंदन करण्यात आले. यावेळी साई संस्थान कर्मचारी सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव पवार, व्हा चेअरमन पोपटराव कोते , सर्व संचालक मंडळ यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना नवनिर्वाचित नगराध्यक्षा जयश्रीताई थोरात पुढे म्हणाल्या की, मी यापूर्वी शिर्डीच्या नगराध्यक्षा होते. त्यावेळी तळागळात जाऊन काम केले व यावेळी करणार आहे. शिर्डीकरांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला तो पूर्ण करणार आहे. असे त्यांनी यावेळी सांगितले व सत्कार केल्याबद्दल संस्थान कर्मचारी सोसायटीचे सर्व सभासद व पदाधिकाऱ्यांचे यावेळी आभार मानले.
यावेळी विष्णू थोरात म्हणाले की मी संस्थांनचा कर्मचारी असल्यामुळे प्रचारात प्रत्यक्ष सहभागी नव्हतो .मात्र संस्थांनचा एक कर्मचारी म्हणून नक्कीच संस्थान कर्मचाऱ्यांनी परिवारातील एक सदस्य समजून या निवडणुकीत मदत केली. त्या सर्व कर्मचाऱ्यांचे तसेच आमचा सत्कार केला याबद्दल साई संस्थान कर्मचारी सोसायटीचे सर्व सभासद व पदाधिकाऱ्यांचे धन्यवाद आहेत. असे त्यांनी सांगितले. तर साई संस्थान कर्मचारी सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव पवार म्हणाले की, विष्णू थोरात हे आमच्या सोसायटीचे सभासद आहेत. त्यांच्या सुविद्य पत्नी नगराध्यक्षा झालेल्या आहेत. यापूर्वीही त्या शिर्डीच्या नगराध्यक्ष होत्या. शिर्डी नगराध्यक्ष हा संस्थांनचा पदसिद्ध विश्वस्त असतो. त्यामुळे साई संस्थांनमधील कायम, कंत्राटी, आऊट सोर्सिंग,व 598 कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी व संस्थान कामगारांना न्याय मिळवून देण्याचा त्या नक्कीच प्रयत्न करतील अशी अशा व्यक्त करत येणारा सिंहस्थ कुंभमेळा काळात त्या नगरपालिका, साई संस्थान व कर्मचारी सोसायटी या सर्वांचा दुवा म्हणून नक्कीच चांगले काम करतील अशी अपेक्षा व्यक्त केली व त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी साई संस्थान कर्मचारी सोसायटीचे संचालक महादु कांदळकर, कृष्णा आरणे, भाऊसाहेब कोकाटे, संभाजी तुरकणे, देविदास जगताप, विनोद कोते, मिलींद दुनबळे, तुळशिराम पवार, रविंद्र गायकवाड, भाऊसाहेब लवांडे, इकबाल तांबोळी, सौ.सुनंदा जगताप, सौ. लता बारसे, रंभाजी गागरे, भाऊसाहेब लबडे (तज्ञ संचालक), विलास वाणी (सचिव), बाबासाहेब अनर्थे (सह. सचिव), संभाजी कोते (सहा.सह. सचिव) यांचेसह सभासद कर्मचारी ,साईभक्त, यांची उपस्थिती होती.
0 Comments