अनेक शहरी व ग्रामीण चिमुकले मुले विविध कलेत निपुण आहेत मात्र त्यांच्या कलेला फारसा वाव मिळत नाही. यासाठी सांस्कृतिक, स्नेहसंमेलना सारखे कार्यक्रम होत असतात. ग्रामीण शहरी भागातील चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या कलेला वाव किंवा संधी मिळाली तर ते नक्कीच आपल्या जीवनात यश प्राप्त करू शकतात. असे अनेक कला गुणसंपन्न विद्यार्थी अहिल्यानगर जिल्ह्यातही आहे. त्यापैकीच कोपरगाव जवळील संजीवनी अकॅडमीत शिकत असलेला चि. आरुष योगेश जगताप हा विद्यार्थी चित्रकला काढण्यामध्ये अगदी निपुण असून त्याला आतापर्यंत विविध चित्रकला स्पर्धेत विविध पारितोषिके मिळाली आहेत.चि. आरुष योगेश जगताप हा विद्यार्थी इयत्ता पाचवी या वर्गात व संजीवनी अकॅडमी कोपरगाव या शाळेत शिकत असून त्याला लहानपणापासूनच चित्रकलेची विशेष आवड असल्याने तो नेहमीच नवनवीन चित्र रेखाटत असतो. अनेक देवी देवतांचे तसेच निसर्गाचे चित्र त्याने आतापर्यंत रेखाटलेले आहे . त्याने रंगोत्सव या तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. असे अनेक स्पर्धेमध्ये त्यांनी सहभाग घेऊन पारितोषिके पटकावले आहेत. त्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. अध्यात्माबद्दल त्याला अधिक आकर्षण असून देवदेवतांचे अनेक चित्र त्याने रेखाटले आहे व तो यापुढेही हे आपले चित्रकलेचे काम शाळा शिकत असतानाही सुरू ठेवणार असल्याचे त्याने म्हटले आहे. त्याने नुकतेच हनुमंतराय यांनी रामरायाची भेट घेतली. हे चित्र उभेउभ रेखाटले असून असे अनेक त्याने रेखाटलेले चित्र आकर्षण ठरत आहे. चिरंजीव आरुष हा मूळचा वैजापूर तालुक्यातील भऊर येथील श्री संभाजीराव शंकरराव पाटील जगताप यांचा नातू व योगेश संभाजीराव पाटील जगताप यांचा मुलगा आहे. तो सध्या कोपरगाव येथील संजीवनी अकॅडमी येथे शिकत असून वडीलही संजीवनी महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. सर्व सुशिक्षित परिवार असल्यामुळे या चिरंजीव आरुषला घरातूनही त्याच्या कला गुण जोपासण्याची साथ व सहकार्य मिळत आहे. तो चित्रकलेत निपुण आहेच पण तो शाळेतही हुशार आहे. त्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
0 Comments