लोणी दि.२१ प्रतिनिधी
नगरपालिका निवडणूकीत अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये महायुतीने ऐतिहासिक विजय संपादन केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रचाराच्या निमित्ताने महायुती मजबूत ठेवून मिळविलेले यश लक्षवेधी ठरले आहे. यामध्ये ९ ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला मिळालेले यश महत्वपूर्ण मानले जात आहे.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांना पालिका निवडणूकीचे प्रभारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली होती. निवडणूकीच्या सुरुवाती पासूनच मंत्री विखे पाटील यांनी महायुतीमध्ये योग्य समन्वय राखून प्रचाराचे नियोजन केले. शिर्डी, राहाता या दोन्हीही नगर परिषदांच्या बरोबरीने पालकमंत्री ना.विखे पाटील यांनी पाथर्डी, देवळाली प्रवरा, कोपरगाव, या ठिकाणी प्रचाराच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जाहीर सभा घेतल्या. ठिकठिकाणी कार्यकर्त्यां समवेत त्यांनी पदयात्रेत सहभाग आणि प्रभागांमध्ये कॉर्नर बैठका घेवून नागरीकांशी संवाद साधला. डॉक्टर, वकील, व्यापारी अशा सर्वच घटकांना त्यांनी प्रचाराच्या माध्यमातून महायुतीशी जोडून घेतले.
महायुती सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये विकासाची प्रक्रीया वेगाने सुरु आहे. जिल्ह्याच्या विकास प्रक्रीयेला केंद्र आणि राज्य सरकारचे सहकार्य मिळत आहे. जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला मिळत असलेली गती या मुद्यांवर मंत्री विखे पाटील यांनी प्रचारामध्ये भर दिला. विरोधी उमेदवारांवर टिका न करता अतिशय संयमाने आणि विकासाचा अजेंडा घेवून मंत्री विखे पाटील यांनी महायुतीच्या प्रचाराचे योग्य नियोजन कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केले. याचे फलित म्हणून जिल्ह्यात सात ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष निवडून आणण्यात यश आले असून, नेवासे येथे महायुती मधील घटक पक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नगराध्यक्ष निवडून आणण्यात यश आले आहे.
बहुचर्चित अशा कोपरगाव मध्येही भाजपाचे नगराध्यक्ष निवडून आल्याने त्या विजयाची चर्चाही विखे पाटील यांच्या भवतीच केंद्रीत झाली आहे. संगमनेरात महायुतीचा पराभव झाला असला तरी, अतिशय सामान्य उमेदवाराच्या प्रचाराला विखे पाटील यांनी उपस्थिती दाखवून कार्यकर्त्यांना पाठबळ दिले. श्रीरामपूर मध्ये भाजपाचे नगरसेवक निवडणून आणण्यात यश मिळवले.
विधानसभा निवडणुकीत एक वर्षापुर्वी जिल्ह्यातील जनतेन असाच महायुतीच्या बाजूने कौल दिला होता.त्याचीच परीणीती नगरपालिका निवडणुकीच्या निकालात मंत्री विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात पुन्हा दिसून आली.
मागील एक वर्षाच्या वाटचालीत जिल्ह्यातील सर्वच तालुक्याच्या विकास प्रक्रीयेला महायुती सरकारच्या माध्यमातून मंत्री विखे पाटील यांनी गती दिली आहे.गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या सिंचन प्रकल्पांचे प्रश्न मार्गी लागत आहेत.औद्यगिक विकासातून रोजगार उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होत आहे.
भाजपाचे संघटन मजबूत करतानाच महायुती मधील घटक पक्ष कुठे दुखावणार नाहीत याची काळजी पालकमंत्री विखे पाटील प्रामुख्याने घेत असल्याने नगरपालिका निवडणुकीत महायुती भक्कमपणे उभी असल्याचे दिसून आले.आगामी अहील्यानगर महापालिकेची निवडणुक तसेच जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या दृष्टीने महायुतीची वाटचाल आशीच राहाण्यासाठी प्रयत्न पालकमंत्री विखे पाटील यांनी सुरू केले आहेत.
0 Comments