शिर्डी ( प्रतिनिधी)-शिर्डी नगरपंचायतीची नगरपरिषद झाल्यानंतर प्रथमच हि निवडणूक झाली. व या शिर्डी नगरपरिषदेच्या निवडणूकीचा अंतिम निकाल 21 डिसेंबर 2025 रविवारी दुपारी जाहीर झाला असून, शिर्डीच्या राजकारणात नामदार राधाकृष्ण विखे पाटील ,डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपने आपला गड भक्कमपणे राखत पुन्हा एकदा येथे आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. शिर्डी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपच्या सौ. जयश्री विष्णू थोरात यांनी 4840 एवढ्या दणदणीत मताने विजय मिळवला आहे.शिर्डी नगराध्यक्ष हे साई संस्थानचे पदसिद्ध विश्वस्तही असतात.
शिर्डी नगरपरिषदेच्या एकूण प्रभागांमध्ये भाजपने मोठी आघाडी घेतली आहे.काही प्रभागांमध्ये अपक्ष आणि अन्य पक्षांच्या उमेदवारांनीही आपली ताकद दाखवली आहे.व विजयी झाले आहेत .
शिर्डी नगरपरिषद विजयी उमेदवार खालील प्रमाणे
प्रभाग क्रमांक १-
निलेश मुकुंदराव कोते (राष्ट्रवादी काँग्रेस)
सुनिता मंगेश त्रिभुवन (भाजपा)
प्रभाग क्रमांक २
🔹 सतिष (नंदूभाऊ) गोविंदराव गोंदकर (अपक्ष)
🔹 सौ. सुनिता वसंत गोंदकर (भाजपा)
प्रभाग क्रमांक ३
🔹 सौ. आशा कमलाकर कोते (शिवसेना – शिंदे गट)
🔹 बापू पांडुरंग ठाकरे (शिवसेना – शिंदे गट)
प्रभाग क्रमांक ४
🔹 सौ. गायत्री राजेंद्र बर्डे (भाजपा)
🔹 नितीन उत्तमराव कोते (भाजपा)
प्रभाग क्रमांक ५
🔹 अभय दत्तात्रय शेळके पाटील (भाजपा)
🔹 सौ. विद्या शाम जाधव (भाजपा)
प्रभाग क्रमांक ६
🔹 सचिन सीताराम गायकवाड (भाजपा)
🔹 सौ. कोमल किरण बोऱ्हाडे (भाजपा)
प्रभाग क्रमांक ७
🔹 सौ. सरिता गणेश सोनवणे (अपक्ष)
🔹 अमित कैलास शेळके (अपक्ष)
प्रभाग क्रमांक ८
🔹 रविंद्र पांडुरंग गोंदकर (भाजपा)
🔹 सौ. छाया पोपट शिंदे (अपक्ष – बिनविरोध)
प्रभाग क्रमांक ९
🔹 अलका वाल्मीक गोतीस (भाजपा)
🔹 दीपक रमेश गोंदकर (राष्ट्रवादी काँग्रेस)
प्रभाग क्रमांक १०
🔹 सौ. वैशाली दत्तात्रय कोते (भाजपा)
🔹 नितीन पाराजी कोते (शिवसेना – शिंदे गट)
प्रभाग क्रमांक ११
🔹 सौ. छाया सुधीर शिंदे (भाजपा)
🔹 अरविंद सुखदेव कोते (भाजपा)
🔹 प्रतीक्षा किरण कोते (भाजपा)
या निवडणुकीत शिर्डी नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्षा अनिता जगताप व माजी उपनगराध्यक्ष सुजित गोंदकर यांना पराभव पत्करावा लागला आहे. सर्व निकाल बाहेर आले नंतर विजयी उमेदवार, कार्यकर्ते व मतदारांनी गुलाल उधळून व फटाक्यांची आतषबाजी करत विजयाचा जयघोष केला. शिर्डी मध्ये डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांची इंट्री प्रतीकात्मक वाघाच्या रथासमवेत मोठ्या उल्हासात करण्यात आली. डॉक्टर सुजय दादा विखे पाटील या विजया संदर्भात बोलताना म्हणाले की, शिर्डी नगरपंचायत व नंतर नगरपरिषद झाली मात्र पहिल्यापासून मतदारांनी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर विश्वास ठेवून आजपर्यंत येथे सत्ता दिली. नगराध्यक्षा व सर्व विजयी नगरसेवक हे विजयी झाले त्यांचे अभिनंदन आहेच, परंतु त्यांना विजयी करण्यामागे शिर्डीतील मतदार, युवक ,महिला, कार्यकर्ते,व जे यावेळी थांबले.या सर्वांचाच या विजयात सहभाग मोठा आहे. असे ते यावेळी म्हणाले. रविवारी दिवसभर विजयी उमेदवारांचे प्रत्यक्ष भेटून भ्रमणध्वनीद्वारे सोशल मीडियावर अभिनंदन होत होते. ठिकठिकाणी सत्कार होत होते.नगराध्यक्ष सौ जयश्री थोरात या साई मंदिर प्रमुख विष्णू थोरात यांच्या पत्नी आहेत. त्या यापूर्वीही शिर्डी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा झालेल्या होत्या. त्यांना शिर्डी शहराचा त्यामुळे सखोल अभ्यास असून त्यांच्याकडून आता मतदार व नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ जयश्रीताई थोरात व सर्वच विजयी उमेदवारांनी या निवडणुकीत मतदारांनी आम्हाला विजयी केले त्याबद्दल धन्यवाद मानले असून शिर्डीच्या विकासासाठी सर्व मिळून प्रयत्न करू असे आश्वासन दिले आहे.
0 Comments