भारतीय लहुजी सेनेचे पंतप्रधानांना निवेदन

-

श्रीरामपूर स्वतंत्र जिल्हा करण्यासह मागासवर्गीय समाजाच्या मागण्यांवर तात्काळ निर्णयाची मागणी

श्रीरामपूर :
भारतीय लहुजी सेनेच्या वतीने देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांना निवेदन सादर करून श्रीरामपूर तालुका स्वतंत्र जिल्हा घोषित करण्यात यावा, तसेच तालुक्यातील मागासवर्गीय समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तात्काळ निर्णय घ्यावा, अशी ठोस मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, भारतीय लहुजी सेना ही सामाजिक न्यायासाठी कार्य करणारी संघटना असून समाजाच्या मूलभूत हक्कांसाठी सातत्याने लढा देत आहे. अहमदनगर (अहिल्यानगर) जिल्हा अतिशय मोठा असून प्रशासनाच्या दृष्टीने श्रीरामपूर तालुक्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे विकासकामे, सामाजिक न्याय व प्रशासकीय निर्णयांमध्ये अडथळे निर्माण होत आहेत.

या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर तालुका स्वतंत्र जिल्हा घोषित करण्यात आल्यास प्रशासन अधिक गतिमान होऊन सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळण्यास मदत होईल, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

तसेच श्रीरामपूर तालुक्यातील मागासवर्गीय समाजाशी संबंधित विविध सामाजिक प्रश्नांवर प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. या सर्व प्रकरणांची सामाजिक न्याय विभागामार्फत सखोल चौकशी करून मागण्या तात्काळ मान्य करण्यात याव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे.

हे निवेदन भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. बाळासाहेब बागुल, राष्ट्रीय सचिव मा. हनीफ भाई पठाण, राज्य प्रमुख मा. सुरेश आधागळे जिल्हा प्रमुख मा. रज्जाक शेख यांच्या स्वाक्षरीने पाठविण्यात आले आहे.

मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास भारतीय लहुजी सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments