सोयगाव वनविभागाच्या हद्दीत, खड्ड्यात हाडांचा सांगाडा, वन्य प्राण्याचा की जनावरांचा! तालुक्यात खळबळ, वनविभाग सुस्त --




दिलीप शिंदे 
सोयगाव दि.२६-- सोयगाव वनपरिक्षेत्र हद्दीत जेसीबीच्या साहाय्याने खोदलेल्या खड्ड्यांमध्ये हाडांचे सांगाडे व आजूबाजूला हाडे विखुरलेल्या अवस्थेत आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार दि.२५ गुरुवारी दुपारी उघडकीस आला.हद्दीच्या वादात शुक्रवारी ही हाडांचे सांगाडे आहे त्याच स्थितीत पडून होते.याप्रकारामुळे  सोयगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. हाडांचे अवशेष वन्यप्राण्यांचे की जनावरांचे हे मात्र निरुत्तरित आहे.
           याबाबत सविस्तर माहिती अशी,सोयगाव वनपरिक्षेत्राच्या हद्दीत असलेल्या मुर्डेश्वर च्या खालील बाजूस वनालगत जेसीबीच्या साहाय्याने मोठमोठे चार खड्डे करण्यात आले आहे. दोन खड्ड्यांमध्ये हाडांचे सांगाडे व आजूबाजूला विखुरलेल्या अवस्थेत हाडे आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी उघडकीस आला.हद्दीच्या वादात मुळे शुक्रवारी ही हाडे आहे त्याच स्थितीत असल्याने वन्यप्राणी प्रेमींकडून वनविभागाच्या निष्काळजी पनावर संताप व्यक्त केला जात आहे.हाडांचे सांगाडे हे वन्यप्राणी की पाळीव जनावरांचे आहे.याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल मिसाळ यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नसल्यामुळे आढळून आलेली हाडे ही वन्य प्राण्यांची की जनावरांची याबाबत संभ्रम निर्माण होत आहे. वनविभागाच्या हद्दीत जेसीबीच्या साहाय्याने मोठमोठे खड्डे कुणी केले,कशासाठी करून ठेवले, वन्यप्राण्यांची तस्करी तर नाही ना याचा शोध वनविभागाने घेणे गरजेचे आहे. जेसीबीच्या साहाय्याने खोदून ठेवलेले खड्डे वनमजूर,वनरक्षक यांच्या निदर्शनास कसे आले नाही. वनमजूर,वनरक्षक व वनपाल हे कार्यक्षेत्रात फिरत नसल्याने हा प्रकार समोर आला नाही. वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल मिसाळ यांचा कर्मचाऱ्यांवर अंकुश राहिलेला नाही. त्यामुळे कर्मचारी कार्यक्षेत्रात फिरत नसल्याने वन्यप्राण्यांसह वन संपदा धोक्यात आली आहे. सर्वसामान्य माणूस वनविभागाची परवानगी न घेता जेसीबी वनविभागाच्या हद्दीत घेऊन जाऊन खोदकाम करून ठेवतो या प्रकारामुळे वनविभागाच्या भूमिकेवर वन्य प्राणी प्रेमींनी प्रश्न उपस्थित केला आहे. वनविभाग या प्रकाराचा छडा लावून हा प्रकार करणाऱ्यासह कामात कसूर करणाऱ्या वनमजूर,वनरक्षक व वनपालवर कारवाई करणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

चौकट:- बहुलखेडा अजगर प्रकरणात वनविभागाकडून कारवाई करण्यात आली.घोसला - बनोटी रस्त्यावर दि.३० जुलै रोजी उद बिल्ला जखमी होऊन मृतावस्थेत आढळला होता. जंगलातांडा जवळ दि. २ ऑगस्ट रोजी चारचाकी वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी व तिघे पाय तुटलेल्या रोहि चा उपचारादरम्यान मृत्यू व दि. १७ सप्टेंबर रोजी मौजे पळाशी नियतक्षेत्र जवळ असलेल्या धरणात मासेमारी साठी लावलेल्या जाळ्यात दोन अजगर आढळून आले होते. एका अजगराचा जाळ्यात करून मृत्यू झाला होता तर दुसऱ्या अजगराचे सर्प मित्रांनी यशस्वी रेस्क्यू करून आदिवासात सोडले होते. या प्रकरणाची चौकशी गुलदस्त्यात असताना त्यात पुन्हा ही भर पडली आहे.

Post a Comment

0 Comments