संघर्ष शेतकरी संघटनेचे सोयगावात भीक मांगो आंदोलन,




दिलीप शिंदे
सोयगाव दि. २३-- शेतकऱ्यांची फार्मर आयडी असतांना देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर अतिवृष्टी अनुदान जमा झाले नसल्याच्या निषेधार्थ संघर्ष शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष विशाल बिंदवाल यांच्या नेतृत्वाखाली भीक मांगो व धरणे आंदोलन करण्यात आले. भीक मागून जमा झालेली रक्कम ३१५ रु तहसीलदार यांनी न स्वीकारल्याने मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ३१५ रु ऑनलाईन जमा करण्यात आले.
         याबाबत सविस्तर माहिती अशी, सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांकडे फार्मर आयडीधारक शेतकऱ्यांना अतिवृष्टी चे अनुदान मिळाले नसल्याने शेतकऱ्यांच्या हितासाठी संघर्ष शेतकरी संघटना सोयगाव तालुक्याच्या वतीने दि.२३ मंगळवारी सोयगावात भीक मांगो व धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून भीक मांगो आंदोलनास सुरूवात करण्यात आली भीक मागत आंदोलनकर्ते शेतकरी हे तहसील कार्यालयात पोहचले यावेळी धरणे आंदोलन करण्यात आले.तहसीलदार मनिषा मेने-जोगदंड यांच्यासह सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. सत्तेत असलेल्या भाजपाचे अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष इद्रिस मुलतानी हे भाजपा पदाधिकाऱ्यांसमवेत तहसीलदार यांच्या दालनात ठाण मांडून असल्याने लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारण्यासाठी तहसीलदार बाहेर आल्या नाहीत. त्यामुळे भीक मागून जमा झालेली रक्कम ३१५ रु तहसीलदार यांना देण्यासाठी आंदोलन कर्त्या शेतकऱ्यांनी तहसीलदार यांचे दालन गाठले यावेळी एकच गोंधळ उडाला होता. दरम्यान भीक मागून जमा झालेली रक्कम ३१५ रु तहसीलदार यांनी स्वीकारण्यास नकार दिला. निवेदन स्वीकारतेवेळी तहसीलदार यांनी खुर्ची सोडली नाही यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात होती. दरम्यान संतप्त शेतकऱ्यांनी भीक मागून जमा केलेली रक्कम ३१५ रु मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ऑनलाइन जमा केली. यावेळी समाधान सूर्यवंशी,अंकुश पगारे यांच्यासह तालुक्यातील शेतकरी मोठया संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. 


प्रतिक्रिया १)- तहसीलदार यांनी आंदोलनाची व दि.१० डिसेंबर रोजी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलेल्या मागण्यानुसार कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

                        विशाल बिंदवाल 
                 तालुकाध्यक्ष संघर्ष शेतकरी संघटना सोयगाव 

२)- सरकार हे शेतकऱ्यांची थट्टा करीत असून तहसीलदार या नेहमी कार्यालयात उशिरा येत असल्याने शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.तहसीलदार यांची मंत्र्यांकडे पुन्हा तक्रार करण्यात येईल.
  
                     समाधान सुर्यवंशी
                 मा. सरचिटणीस भाजप सोयगाव

दिलीप शिंदे सोयगाव तालुका प्रतिनिधी यांच्या सहकार्याने नेटवर्क वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे.


Post a Comment

0 Comments