महात्मा गांधी विद्यालयात सेवा महोत्सव उत्सवात



लोहगाव (वार्ताहर): प्रवरानगर येथील महात्मा गांधी विद्यालय, कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात अहिल्यानगर भारत स्काऊट विभागाच्या वतीने आयोजित केलेला खरी कमाई सेवा महोत्सव नुकताच उत्साहात संपन्न झाला. मुले विभागाच्या या सेवा महोत्सवाचे उद्घाटन प्राचार्य विनायक मेथवडे आणि कन्या विभागाच्या सेवा महोत्सवाचे उद्घाटन मुख्याध्यापिकांना नलिनी जाधव यांच्या हस्ते झाले.

 यावेळी शुभेच्छापर मनोगतातून प्राचार्य विनायक मेथवडे यांनी सांगितले की, स्काऊटचा हा एक सत्य उपक्रम असून विद्यार्थ्यांना यातून उत्तम व्यावहारिक ज्ञान, परिश्रमाची आवड आणि चिकाटी अंगी बाळगावी. यावेळी मुख्याध्यापिका नलिनी जाधव व उपमुख्याध्यापक दिलीप डहाळे यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत नरेंद्र ठाकरे यांनी केले. यावेळी पर्यवेक्षिका संगीता सांगळे, संजय ठाकरे, डॉ. शरद दुधाट, रेणुका वर्पे, प्रियंका भालेराव, दीपक धोत्रे, तुषार निर्मळ, विलास गभाले, प्रफुल्ल नव्हाळे, माधुरी वडघुले, श्रीमती टावरे, श्रीमती सोनवणे, गुडघे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments