निष्काम कर्मयोगी राष्ट्रसंत संत गाडगेबाबा यांच्या पावन स्मृतीस सोयगावात विनम्र अभिवादन..



दिलीप शिंदे 
सोयगाव दि.२०-- सोयगाव येथील संत गाडगेबाबा चौकात संपत मंडवे यांच्या हस्ते निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत पूजन करण्यात आले. संत गाडगेबाबा यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.

दरम्यान संत गाडगेबाबा यांनी आपल्या जीवनातील मुख्य उद्देश म्हणून समाजातील दुर्बल आणि पीडित वर्गाचे कल्याण केले. त्यांचे कार्य मुख्यत: अंधश्रद्धा निर्मूलन, जातिवाद निर्मूलन, शिक्षण प्रसार, आणि सफाई अभियान यावर केंद्रित होते. त्यांचा उपदेश नेहमीच साधा आणि सरळ होता. त्यांनी लोकांना जागरूक केले. संत गाडगेबाबा हे एक सशक्त समाजसुधारक होते, ज्यांनी आपले संपूर्ण जीवन गरीब आणि वंचित वर्गाच्या उन्नतीसाठी समर्पित केले. त्यांचा जीवनाचा ध्यास होता.साधेपणाने जीवन जगणे आणि प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार देणे हा संत गाडगेबाबांचा जीवनाचा मार्गदर्शक संदेश आजही समाजातील लोकांसाठी उपयुक्त असल्याचे सामाजिक कार्यकर्ते दत्तू रोकडे यांनी सांगितले. यावेळी योगेश रोकडे, कृष्णा शेवाळकर, अनिल निकुंभ,गोकुळ रोकडे, बबन रोकडे,बापू महाले,सुनील रोकडे, सुनिल निकम, अमोल निकम,संतोष महाले,रामराव रोकडे,संदीप इंगळे,अनिल मानकर,संदीप इंगळे, अशोक ढगे, कृष्णा पाटील, आण्णा जाधव, दिलीप शिंदे, भावडू गाडेकर,अनिल लोखंडे आदींसह प्रतिष्ठित नागरिक व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments