सावळीविहीर बु. येथील ग्रामदैवत श्री परशुराम महाराजांचा गुरुवार 4 डिसेंबर रोजी यात्रोत्सव!

शिर्डी ( प्रतिनिधी)-राहाता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथील ग्रामदैवत असणाऱ्या श्री परशुराम महाराज यांचा यात्रा उत्सव गुरुवार दिनांक 4 डिसेंबर 2025 रोजी विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री दत्त जयंती या दिवशी गुरुवार दिनांक 4 डिसेंबर 2025 रोजी श्री परशुराम महाराज यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

दरवर्षी गावातील युवक कोपरगाव येथून पायी कावडीने गोदाजल घेऊन येतात . या गोदाजलाची चार डिसेंबर रोजी गावातून मिरवणूक काढून या गोदाजलाने श्रींना जलाअभिषेक करण्यात येणार असून सकाळी 11 वाजता भोजडे येथून आलेल्या मानाच्या श्री परशुराम महाराज काठीची मिरवणूक गावातून  डफाच्या निनादात निघणार आहे. या मानाच्या काठीचे ठिकठिकाणी रांगोळी काढून व पूजन करून स्वागत होणार आहे. विशेष म्हणजे सायंकाळी मंदिरासमोर रुई रोडला श्री परशुराम भक्ता कडून  बारा गाड्या ओढण्याचा  कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर  व्हईक , व इतर धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.यात्रेनिमित्त श्री परशुराम महाराज मंदिरासह गावातील श्री दत्त मंदिर व इतर मंदिरांवर आणि परिसरातील मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यात्रा यशस्वीतेसाठी समस्त ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.

Post a Comment

0 Comments