सत्तेचा महासंग्राम (डिजिटल मिडिया)
टाकळीभान प्रतिनिधी: टाकळीभान येथील विक्रांत क्रिडा मंडळाचा खेळाडू हेमंत पोपटराव पटारे याने नाशिक येथे झालेल्या राष्ट्रीय सायकल स्पर्धेत (इव्हेन्ट) मध्ये सहभाग घेऊन एसआर हा मानाचा पुरस्कार प्राप्त केला आहे. एकाचवेळी ६०० किलोमीटर अंतर त्याने टारगेट वेळेपेक्षा तब्बल ५ तास अगोदर पुर्ण केले. या यशातून श्रीरामपूरच्या सायकलिंग क्षेत्रात हेमंतने आणखी एक मानाचा तूरा रोवला आहे. नाशिक - येवला- वैजापूर- गेवराई हे मोठे अंतर त्याने दिवस - रात्र सायकल चालवून अवघ्या ३५ तासांत पूर्ण केले.
ऑडकस क्लब पॅरीसियन यांनी, हा इव्हेन्ट आयोजित केला होता. या अगोदरही हेमंत याने २०० किमी, ३०० किमी व ४०० किमी अंतराच्या स्पर्धा वेळेत पूर्ण केल्या आहेत. हेमंतला माजी प्राचार्य रंगनाथ माने, डॉ. मुंदडा व नामवंत सायकल पहुंचे मार्गदर्शन मिळाले आहे. हेमंतवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. विक्रांत क्रिडा मंडळाच्या वतीने हेमंतचा दिव्य सत्कार करण्यात येणार आहे.
0 Comments